Goa Rain Updates Dainik Gomantak
गोवा

Goa Weather Explained: गोव्यात मॉन्सूनच्या परतीचा प्रवास का लांबला?

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी : नैऋत्य मोसमी वारे म्हणजेच मॉन्सूनचा गोव्यातून परतीचा प्रवास लांबणीवर पडणार आहे. दरवर्षी 14 ऑक्टोबर रोजी गोव्यातून मॉन्सून माघारी फिरतो. मात्र, यावर्षी पावसाने ही तारखी चुकवली आहे. यामागचे कारण काय आहे हे जाणून घेऊया...

मान्सून बाहेर पडला हे कधी जाहीर केले जाते?

नैऋत्यू मॉन्सूनची माघार या संदर्भात भारताच्या हवामानशास्त्राने निकष जाहीर केले आहे. सलग पाच दिवस पाऊस पडला नाही, आर्द्रतेचे प्रमाण लक्षणीरित्या कमी होणे तसेच खालच्या ट्रोपोस्फियरमध्ये अँटीसायक्लोनची स्थापना होणे असे तीन महत्त्वाचे निकष आहेत. या आधारेच मान्सूनच्या माघारीची घोषणा केली जाते.

गोव्यात यंदा मान्सूनचा मुक्काम का वाढला?

गोव्यातून मॉन्सून 14 ऑक्टोबरपर्यंत बाहेर पडतो. पण यंदा मात्र तसे घडले नाही. यामागे दोन घटक कारणीभूत ठरल्याचे सांगितले जाते.

पहिलं म्हणजे बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. दुसरं म्हणजे मध्य आणि पूर्व अरबी समुद्रात तयार झालेली कमी दाबाची चक्रीय हवा. भारतात नैऋत्य मॉन्सूनच्या प्रवासात अरबी समुद्र आणि बंगालचा उपसागर या दोघांची भूमिका महत्त्वाची ठरते.

या दोन ठिकाणी वातावरणातील बदलांमुळे यंदा गोव्यात पावसाचा मुक्काम वाढला. आणखी काही दिवसांनी गोव्यातू मॉन्सून बाहेर पडेल, असे तज्ज्ञांनी सांगितले. मात्र, नेमकी तारीख अद्याप सांगण्यात आलेली नाही.

पुढील तीन दिवस गोव्याबाबत IMD ने काय अलर्ट दिला आहे?

15 ऑक्टोबर रोजी यलो अलर्ट जारी केला आहे. कोकण आणि गोवा येथील काही भागात मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज IMD च्या वेबसाईटवर वर्तवण्यात आला आहे. तर 16 आणि 17 ऑक्टोबर रोजी पाऊस पडणार नाही, असे दिसते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Chirag Nayak: मडगावचे युवा उद्योजक चिराग नायक लवकरच सुरु करणार राजकीय इनिंग; काँग्रेसची धरणार वाट!

Aquino De Bragança: मोझांबिकच्या स्वातंत्र्य लढ्यातील 'गोमंतकीय शिलेदार'

Bhool Bhulaiyaa 3: भूताचे चित्रपट बघताना भीती वाटते? या टीप्स वाचा आणि मित्रांसोबत भयपट एन्जॉय करा

Goa MLA Disqualification Case: मोठी बातमी! 8 बंडखोर काँग्रेस आमदारांविरोधातील याचिका सभापती तवडकरांनी फेटाळली

Goa News: कुळण येथे गुलमोहराचे झाड पडल्याने रस्ता वाहतुकीस बंद; वाचा दिवसभरातील घडामोडी

SCROLL FOR NEXT