Goa : Drinking water supply collect in bottle for sampling. This water supply from water resoures Palyem Pernem. Dainik Gomantak
गोवा

Goa : पालयेवासीयांना अपायकारक गढूळ पाणीपुरवठा

Goa : आरोग्य खात्याच्या प्रयोगशाळेतील तपासणीत आढळली अनेक घातक द्रव्ये

Mahesh Tandel, prakash talavnekar

पेडणे : पालये येथे नळाद्वारे पाणीपुरवठा (Water supply) केल्‍या जाणाऱ्या पाण्‍यात आरोग्याला घातक द्रव्‍ये आढळली. सदर पाणीपुरवठा मानवी शरीराला अपायकारक असल्याचे पणजी येथील आरोग्य केंद्रातील प्रयोगशाळेत (Panjim Health Testing Lab.) तपासणी केल्यानंतर स्पष्ट झाले आहे.

पालये गावासाठी कुपनलिकेपासून मिळणारे पाणी नळाद्वारे देण्यात येते. गेल्या उन्हाळ्यातील मे महिन्यापासून पालये गावाला पुरवठा करण्यात येणारे पाणी गढूळ असल्याने येथील माजी पंचायत सदस्य प्रेमानंद कदम यांनी हे पाणी पणजी येथील आरोग्य केंद्राच्या प्रयोगशाळेत तपासणीसाठी दिले. तपासणीत त्‍या पाण्‍यात आरोग्याला घातक अशी प्रथिने सापडली. त्यामुळे अशा प्रकारचे पाणी पिणे आरोग्यास घातक आहे.

काय आढळले पाण्‍यात?
आरोग्य खात्याच्या प्रयोगशाळेत पृथक्करण करून दिलेल्या अहवालात क्लोराईड ६३.९, सल्फेट ९ एम. जी., ऑक्साबिलिटी ८, लोखंड ८६ एम.जी., सल्फेट ९ एम. जी. हे घटक मोठ्या प्रमाणात मिळाल्याचे स्पष्ट केले आहे. आरोग्य खात्याच्या प्रयोग शाळेत या पाण्याचे पृथक्करण केल्यानंतर अशा प्रकारचे पाणी मानवी उपयोगांसाठी योग्य नसल्याचे म्हटले आहे.

पालये गावाला तीन - चार ठिकाणी कुपनलिकेद्वारे पाणी ओढून घेऊन नळाद्वारे ते पुरविण्यात येते. आरोग्य खात्याकडून हे पाणी पिण्यासाठी योग्य नसल्याचा अहवाल मिळाल्यावर प्रेमानंद कदम यांनी पेडणे पाणीपुरवठा कार्यालयाचे साहाय्यक अभियंते व पालये ग्रामपंचायतीत तक्रार नोंदविली. पण, अद्याप त्यावर कसलीही उपाययोजना केलेली नाही. सरकारने लोकांच्या जीवावर उदार होऊन खेळू नये, असे पालये गावातील ग्रामस्थांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'हा' बॉलिवूड अभिनेता बनणार 'कांतारा' फेम ऋषभ शेट्टीचा औरंगजेब! 2027 मधील सर्वात मोठ्या चित्रपटाची चर्चा

Goa Crime: भाडेकरुनेच केला मालकाचा आणि मित्राचा खून? दुहेरी हत्याकांडाने हादरले साळीगाव! पोलिसांकडून तपास सुरु

Illegal Betting Case: ईडीची मोठी कारवाई! सुरेश रैना आणि शिखर धवन यांची 11.14 कोटींची संपत्ती जप्त; 'वन एक्स बेट'चा प्रमोशन करार पडला महागात

ट्रेनमध्ये भारतीय जवानाचा खून; चादरच्या वादातून साबरमती एक्सप्रेसमध्ये घडली घटना

"... म्हणून मी मांसाहार सोडला", आरोग्यमंत्री विश्वजित राणेंचा भावनिक खुलासा; Watch Video

SCROLL FOR NEXT