Goa Amar Bandekar Case Dainiak Gomantak
गोवा

Goa Amar Bandekar Case: किरकोळ कारणावरून हत्या, आता न्यायालयात हिशेब! तिघांविरुद्ध खुनाचा खटला चालणार, दोषमुक्ततेचा अर्ज फेटाळला

Harmal Beach Shack Murder Case: प्रजासत्ताकदिनी संध्याकाळी हरमल येथे बीच शॅकवर खुर्चीवरून झालेल्या वादातून अमर बांदेकर या स्थानिकाचा मृत्यू झाला होता.

दैनिक गोमन्तक डिजिटल

पणजी : प्रजासत्ताकदिनी संध्याकाळी हरमल येथे बीच शॅकवर खुर्चीवरून झालेल्या वादातून अमर बांदेकर या स्थानिकाचा मृत्यू झाला होता. डोक्याला व मेंदूला गंभीर मार लागल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले होते. बांदेकर याला मारहाण करणाऱ्या सुरेंद्र कुमार, ललित कुमार आणि विभीषण कुमार यांनी दाखल केलेला दोषमुक्ततेचा अर्ज न्यायालयात सादर केला होता; मात्र अतिरिक्त सत्र न्यायालयाने तो अर्ज फेटाळून तिन्ही आरोपींविरुद्ध आरोप निश्चित करण्याचे आदेश दिले आहेत. तिघांविरुद्ध ‘भारतीय न्याय संहिता’ २०२३ च्या कलम १०३ अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

मेरशी येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश बोस्को रॉबर्ट्स यांनी उच्च न्यायालयाच्या २ एप्रिल २०२६ च्या निर्देशानंतर या अर्जावर नव्याने सुनावणी घेऊन हा आदेश दिला. उच्च न्यायालयाने ट्रायल कोर्टाला सहा आठवड्यांच्या आत या अर्जावर पुनर्विचार करण्याचे आदेश दिले होते. मांद्रे पोलिसांनी २७ जानेवारी २०२५ रोजी या प्रकरणी गुन्हा नोंदवला होता. तक्रारीनुसार, २६ जानेवारी २०२५ रोजी संध्याकाळी हरमल येथील ‘सी लाउंज’ बीच शॅकवर किरकोळ शाब्दिक चकमकीनंतर संशयितांनी पीडितावर जीवघेणा हल्ला केला होता. त्याच्या डोक्यावर व चेहऱ्यावर गंभीर प्रहार करण्यात आले होते. हल्ल्यानंतर जीव वाचवण्यासाठी पीडित पळत असतानाही त्याचा पाठलाग केला. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

न्यायालयाचे निरीक्षण

  • आरोपींच्या वतीने युक्तिवाद करण्यात आला की, हा प्रकार खुनाच्या श्रेणीत येत नाही, तर तो ‘सदोष मनुष्यवध’ असू शकतो. तसेच, पीडिताचा मृत्यू हल्ल्यामुळे नव्हे, तर हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचा दावा करत शवविच्छेदन अहवालाचा आधार घेण्यात आला.

  • मात्र, न्यायाधीश रॉबर्ट्स यांनी हा युक्तिवाद फेटाळून लावला. शवविच्छेदन अहवालात मृत्यूचे कारण ‘डोक्याला व मेंदूला बसलेला गंभीर मार’ असल्याचे स्पष्ट नमूद केले आहे. डोक्यासारख्या नाजूक भागावर वार करणे हे पीडिताला ठार मारण्याचा हेतू स्पष्ट करते, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.न्यायालयाने दोषमुक्ततेचा अर्ज फेटाळत तिघांविरुद्ध कलम १०३, २३८ व ३(५) अंतर्गत आरोप निश्चित करण्याचे आदेश दिले. संशयित सध्या न्यायालयीन कोठडीत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 'ऑर्डर उशिरा का आणली?' म्हणत डिलिव्हरी बॉयला फ्लॅटमध्ये खेचून मारहाण, तीन मिनिटांचा CCTV व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! पगार किती वाढणार? फिटमेंट फॅक्टर किती असेल? 5 महत्त्वाचे अपडेट्स आले समोर

Rishabh Pant Record: गिलख्रिस्टचा वर्ल्ड रेकॉर्ड उद्ध्वस्त! ऋषभ पंत बनला 'सिक्सर किंग', परदेशात 'अशी' कामगिरी करणारा ठरला पहिलाच खेळाडू

Investment Fraud: भरघोस परताव्याचं स्वप्न दाखवलं अन् 85.5 लाखांवर डल्ला! शिवोलीतील महिलेची फसवणूक, मुंबईतील दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल

AUS vs BAN: क्रिकेटविश्वात मोठा उलटफेर! बांगलादेशनं बलाढ्य ऑस्ट्रेलियाला 9 विकेट्सनं लोळवलं, 30 मिनिटांत कांगारूंचा खेळ खल्लास Watch Video

SCROLL FOR NEXT