Lessons from Animals: प्राण्यांकडूनही शिकता येतात जीवनाचे धडे! मुंग्यांची शिस्त, पक्ष्यांची मेहनत अन् निसर्गाची जादू

Nature and Wildlife: प्राण्यांच्या विविध हालचाली आणि वागण्यातून माणसाला खूप काही शिकता येते.
Nature and Wildlife
Lessons from AnimalsDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

मधू य. ना. गावकर

प्राण्यांच्या विविध हालचाली आणि वागण्यातून माणसाला खूप काही शिकता येते. प्राणी आपले अन्न कसे शोधतात, निसर्गाशी जुळवून कसे घेतात आणि संकटावर कशी मात करतात हे पाहण्यासारखे असते. निसर्गातील प्रत्येक जीव आपल्याला काही ना काही धडा शिकवून जातो.

प्राणिजगताबद्दल सर्वांना एक प्रकारचे आकर्षण, उत्सुकता आणि जिज्ञासा वाटत असते. पशु, पक्षी, किटक यांच्या मानसी जगताची अथांग संख्या येते. इत्यादी माता जेव्हा आपल्या मुलाला घास-भरवताना शिकवण्याची, संगोपनाच्या गोष्टी सांगते, तेव्हा पासूनच मुलाला सुक्ष्म पशू-पक्ष्यांची ओळख होण्यास सुरवात होते. मुले आपल्या शिशुवयात कुत्रा, मांजर, गाय, म्हैस यांच्याकडे नाते जोडून स्नेहभावास सुरवात करतात. त्या पुढील काळात फुलपाखरे, चटकोर पकडण्याचा प्रयत्न करतात. पुढील आयुष्यात मासळी, पक्षी ससे, खार, यांच्या प्रेमात पडत, वेगवेगळे छंद लावून घेतात. अशा ज्ञानाने ती दुसऱ्या प्राण्यांवर प्रेम करीत त्यांचे पालन करण्याच्या कला शिकतात. प्राण्यांच्या झुंजी लावण्यात त्यांना मजा वाटते.

Nature and Wildlife
Goa Politics: गोवा फॉरवर्डची विरोधकांना एकत्र येण्याची हाक; काँग्रेससह सर्व पक्षांशी तातडीने चर्चा करणार

त्याच काळात ते प्राण्यांचे खेळणे बागडणे, पाहून त्याप्रमाणे वाटचाल करतात. झाडावर चढणे, पाण्यात पोहणे, फळे पाडणे, अशा गोष्टी आत्मसात करीत उनाड वयात प्रवेश करीत रोमहर्ष अनुभवतात. शिकार, सर्कस, संग्रहालय, मत्स्यालय, अरण्य यांच्या उगमाच्या दिशेने वाटचाल करतात. प्राणी जगतात अशा अनेक मजेदार गोष्टी निसर्गात दडलेल्या आहेत. त्यांच्या विविध हालचाली, लकबी, सवयी यांचा अभ्यास करताना अनेकांना आनंद वाटतो. कला-प्रकार, त्यांची गुणवैशिष्ट्ये, उपयोग, दिशा-वाटचाल करण्याच्या पद्धती, किंवा त्यांचा स्वभाव व हालचालींमधील वेगळेपण, सफाई यांचा अभ्यास करताना अनेकांच्या मनात आनंद निर्माण होतो. त्यांच्याकडून अनेक चांगल्या गोष्टी शिकण्यास मिळतात.

पक्षी आपल्या घरट्यांची सुंदर रचना करतात. पिल्लांना भरवण्यासाठी अन्न शोधतात. शिकारी प्राण्यांपासून पिल्लांचे संरक्षण करतात. प्राण्यांच्या वेगवेगळ्या चांगल्या गोष्टी आपणास शिकण्यास मिळतात. पक्षी, कुत्रे, मांजरी, बैल, गाय यांच्यापासून शिकण्यासारख्या अनेक गोष्टी असतात. निसर्गसौंदर्य, वनस्पतींमुळे फुलझाडांच्या, वनस्पतींच्या आजूबाजूला मिळणारी फळे, फुले मानवाला आनंद देतात. उद्यानात पाखरांच्या, पक्ष्यांच्या रांगा व त्यांची विविध जोड कामे पाहून माणसाला भुरळ पडते.

पुढील टप्प्यावर पक्षी किंवा प्राणी माणसाला ज्ञान देतात. पक्ष्यांच्या शिकवणुकीतून अनेक गोष्टी शिकता येतात. पिल्लांना उडणे शिकवताना, पाठीवर घेऊन उडण्याचे धाडस शिकवतात. तसेच इतर पक्षी आणि प्राण्यांच्या जीवनपद्धतीतून खूप काही शिकायला मिळते. माणसाला त्यांच्याकडून अनेक गोष्टी शिकता येतात. निसर्गातील झाडे, प्राणी, पक्षी, किटक, सूक्ष्मजीव सर्वांचे जीवन एका नियमाने चालते. मुंग्यांचे शिस्तबद्ध काम, कोळ्याचे जाळे विणणे, पक्षांची घरटी बांधणे या सर्वांमधून माणसाला खूप काही शिकता येते.

माणसाला निसर्गाने दिलेल्या या अथांग देणगीची जाणीव ठेवायला हवी. निसर्गात प्रत्येक घटकाचे एक विशिष्‍ट कार्य असते. प्रत्येक जीव निसर्गाच्या साखळीत महत्त्वाचा आहे. माणसाने निसर्गाचे आणि या प्राण्यांचे रक्षण केले पाहिजे. झेंडूच्या फुलांवर सूर्याची सोनेरी किरणे पडल्यावर कैक रंगाची फुलपाखरे त्या फुलाभोवती तालगडी खेळत गोफ विणतात. त्या फुलपाखरांतील एक फुलपाखरू झाडाचे सुकलेले कॉफी रंगाचे पान म्हणून हात लावला, तर त्याला स्पर्श होतो न होतो त्या फुलपाखराने आपले पंख उघडून मला आश्‍चर्याचा धक्का दिला. उघडलेल्या पंखावर निळ्या आकाशात संध्याकाळी दिसणारे इंद्रधनुष्य त्या सुकलेल्या पानरुपी फुलपाखराच्या पंखावर पाहून मी चक्रावून गेलो.

Nature and Wildlife
Goa Cricket Association: 50 कोटींच्या कथित गैरव्यवहारप्रकरणी जीसीएचा इशारा; आरोप सिद्ध झाल्यास दोषींवर कायदेशीर कारवाई

सकाळच्या प्रहरी सोनचाफ्याच्या दोन फांद्यांच्या मध्ये मच्छर किटकांनी सुताप्रमाणे धागा बांधून त्या धाग्यावर जाईजुईचा हार गुंफल्याप्रमाणे एकमेकांत अडकून सूर्याची किरणे अंगावर झेलीत होती. यावरून समजते की, माणूस हार गुंफण्याची कला किटकांपासून शिकला. असंख्य प्रकारे निसर्गाचे चमत्कार पाहून माणूस थक्क होतो आणि निसर्गाचे हे सौंदर्य अनुभवताना स्वतःला भाग्यवान समजतो. माणसाला निसर्गाच्या अद्‍भूत लीलांचे कौतुक वाटते. सागराच्या पाण्यात राहणाऱ्या देवमाशाला मोठा बनवला. डॉल्फीन मासा माणसाप्रमाणे आवाज काढतो. सांबर हरणाची शिंगे औषधासाठी वापरतात.

प्राण्यांच्या विविध हालचाली आणि वागण्यातून माणसाला खूप काही शिकता येते. प्राणी आपले अन्न कसे शोधतात, निसर्गाशी जुळवून कसे घेतात आणि संकटावर कशी मात करतात हे पाहण्यासारखे असते. निसर्गातील प्रत्येक जीव आपल्याला काही ना काही धडा शिकवून जातो. सुंदर निसर्ग आपल्याला शांतता आणि प्रसन्नता देतो. प्राण्यांची एकमेकांशी असणारी संवाद साधण्याची पद्धतही माणसाला अचंबित करते. पक्षी, प्राणी आपापल्या पद्धतीने संवाद साधतात. निसर्गात प्रत्येक ऋतूत होणारे बदल माणसाला बदलांशी जुळवून घेण्यास शिकवतात.

पावसाळ्यात पडणारा पाऊस, हिवाळ्यातील थंडी आणि उन्हाळ्यातील ऊन या सर्वांचा निसर्गातील जीवसृष्टीवर मोठा प्रभाव पडतो. माणसाने प्राण्यांचे आणि निसर्गाचे संवर्धन करणे अत्यंत आवश्यक आहे. वाढत्या प्रदूषणामुळे आणि जंगलतोडीमुळे अनेक प्राणी आणि पक्षी नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. जर आपण निसर्गाचे संतुलन बिघडवले तर त्याचा थेट परिणाम मानवी जीवनावर होणार आहे. त्यामुळे निसर्गाचा आदर करणे आणि प्राण्यांचे रक्षण करणे हे प्रत्येक माणसाचे आद्य कर्तव्य आहे. निसर्गाच्या सहवासात राहूनच माणूस खऱ्या अर्थाने समृद्ध आणि आनंदी जीवन जगू शकतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com