Ganesh Idols Dainik Gomantak
गोवा

Ganesh Chaturthi: मूर्तिकारांना पावला 'बाप्पा'; मानधनात होणार दुप्पट वाढ

Goa Hastkala Vikas Mahamandal: वित्त विभागाने तब्बल १ कोटी रुपयांची तरतूद केली आहे; प्रत्येक मूर्तिकाराला केवळ २५० मूर्तींसाठी अनुदान मिळणार

गोमन्तक डिजिटल टीम

Ganesh Chaturthi 2024

पणजी: यंदाच्या चतुर्थीसाठी मातीपासून गणपती मूर्ती बनवणाऱ्या ४११ कलाकारांनी अनुदानासाठी गोवा हस्तकला विकास महामंडळाकडे अर्ज केला आहे. त्यांच्या मानधनात दुप्पट वाढ करण्यात आली आहे. यापूर्वी त्यांना १०० रुपये मानधन प्रत्येक मूर्तीमागे देण्यात येत होते. त्यात वाढ करून आता २०० रुपये करण्यात आल आहे अशी माहिती महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

या वर्षी मूर्तिकारांच्या आर्थिक मदतीत वाढ करताना वित्त विभागाने तब्बल १ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. प्रत्येक मूर्तिकाराला केवळ २५० मूर्तींसाठी अनुदान मिळणार आहे.

महामंडळाकडे नोंदणी केलेले कलाकारच अनुदानास पात्र असतील. त्यामुळे त्याचा फायदा नवीन कलाकारांना घेता येणार नाही. गणेशमूर्ती कलाकारांनी मातीच्या मूर्ती स्वतः केलेल्या असणे आवश्‍यक आहे. नवीन कलाकारांची नावे यादीतून वगळल्यावरच त्यांची नोंदणी केली जाईल, असेही महामंडळाने स्पष्ट केले आहे.

गणेशमूर्तींच्या रंगकामासाठी लागणारे साहित्य बरेच महाग झालेले आहे. त्यामुळे सरकारने गोमंतकीय मूर्ती कलाकारांसाठी देण्यात येणाऱ्या मानधनात वाढ करण्याची मागणी यापूर्वी केली होती. हा प्रश्‍न हल्लीच झालेल्या विधानसभेवेळी काही मतदारसंघातील आमदारांनीही खात्याच्या मागण्यांवरील चर्चेवेळी उपस्थित केला होता. तेव्हा संबंधित मंत्र्यांनी त्यात वाढ करण्याचे आश्‍वासन दिले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT