Margao Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: कुडचडे बलात्कार प्रकरण: जीम ट्रेनर सरवर खानला अटकपूर्व जामीन! अटक केल्‍यास 50 हजारांच्‍या जामिनावर सोडण्‍याचा आदेश

Curchorem Crime: सरवर खान याने अटकपूर्व जामिनासाठी केलेला अर्ज आज दक्षिण गोव्‍याच्‍या प्रधान सत्र न्‍यायाधीश शेरीन पॉल यांनी मंजूर केला.

Sameer Amunekar

मडगाव: कुडचडे येथील एका युवतीचे अपहरण करून बोगमाळो-वास्‍को येथे तिला नेऊन तिच्‍यावर बलात्‍कार करण्‍याचा आरोप असलेल्‍या कुडचडेच्‍या हायड्रा फिटनेस या आस्‍थापनाचा मालक व जीम ट्रेनर सरवर खान याने अटकपूर्व जामिनासाठी केलेला अर्ज दक्षिण गोव्‍याच्‍या प्रधान सत्र न्‍यायाधीश शेरीन पॉल यांनी मंजूर केला. संशयिताला अटक केल्‍यास त्‍याला ५० हजाराचा जामीन आणि तत्‍सम हमीवर मुक्‍त करावे असा आदेश त्‍यांनी दिला.

सरवर खान याच्‍या विरोधात बलात्‍कार, विनयभंग, अपहरण, मारहाण करणे व धमकी देणे या आरोपाखाली गुन्‍हे दाखल करण्‍यात आले होते. खान याला अटक करावी यासाठी बजरंग दल कार्यकर्त्यांनी यापूर्वी कुडचडेत निदर्शने केली होती.

मात्र या प्रकरणात संशयिताची बाजू मांडताना ॲड. अमेय प्रभूदेसाई यांनी हा अपहरणाचा किंवा बलात्‍काराचा प्रकार नव्‍हेच, असा युक्तिवाद करताना ज्‍या रिसॉर्टमध्‍ये हा प्रकार झाल्‍याचा दावा आहे, तो रिसॉर्ट त्‍या युवतीनेच बुक केला होता आणि सुरुवातीच्‍या आपल्‍या तक्रारीत तिने आपल्‍यावर बलात्‍कार केल्‍याचा आरोप केलाच नव्‍हता याकडे न्‍यायालयाचे लक्ष वेधले.

जीवे मारण्याची धमकी!

युवतीची न्‍यायदंडाधिकाऱ्यांसमोर जबानी नोंद करून घेतली असता, तिने लग्‍नाचे कारण सांगून संशयिताने आपल्‍याला कुडचडेहून वास्‍कोला आणले. गाडीत त्‍याने आपला विनयभंगही केला. नंतर एका रिसॉर्टमध्‍ये नेऊन आपल्‍याला आत कोंडून बलात्‍कार केला.

त्‍यावेळी संशयित नशेत होता आणि आपण आरडाओरडा केल्‍यास किंवा मदतीसाठी कुणाला बोलावून घेतल्‍यास आपल्‍याला जीवे मारण्‍याची धमकी दिली, असे त्‍या युवतीने आपल्‍या जबानीत म्‍हटले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Two US Navy Aircraft Crash: 30 मिनिटांत 2 अपघात! दक्षिण चीन समुद्रात अमेरिकेचे हेलिकॉप्टर आणि फायटर जेट क्रॅश; 5 नौदल अधिकारी जखमी VIDEO

Prithvi Shaw Double Century: 34 चौकार, 5 षटकार... पुन्हा एकदा 'शॉ' टाईम! पृथ्वीच्या बॅटमधून चौकार-षटकारांचा वर्षाव, 140 चेंडूत झळकावलं द्विशतक

Shashi Tharoor: आर्यन खानची वेब सीरीज बघून शशी थरूर यांनी केले ट्विट, शाहरुखला म्हणाले, "एक बाप म्हणून तुला... "

टक्सीवाल्यांनी ब्लॅकमेल केलं, त्रास दिला; पर्यटक संतापला म्हणाला, पुढच्यावेळी गोवा की फुकेत? याचा विचार करावा लागेल

Rohini Kalam: क्रीडा विश्वात खळबळ! आंतरराष्ट्रीय खेळाडूनं संपवलं जीवन, घरात लटकलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

SCROLL FOR NEXT