Government Scheme Dainik Gomantak
गोवा

Government Scheme: गोव्यातील महिलांसह गरजू घटकांना मोठा दिलासा! गृहआधार आणि 'दयानंद' योजनेच्या मासिक मदतीत वाढ; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

Goa Gruha Aadhaar Scheme Amount Increase: सध्या गृहआधार योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा १,५०० रुपये आर्थिक मदत थेट बँक खात्यात दिली जाते.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: गोव्यातील महिलांना आधार देणारी ‘गृहआधार’ योजना तसेच ज्येष्ठ नागरिक, विधवा, एकल महिला आणि दिव्यांगांसह विविध गरजू घटकांना आर्थिक आधार देणाऱ्या दयानंद सामाजिक सुरक्षा योजनेच्या मासिक आर्थिक मदतीत वाढ करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी जाहीर केले.

या दोन्ही योजना गेल्या सुमारे १२ वर्षांपासून सुरू असून, या कालावधीत जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे लाभार्थ्यांना मिळणारी सध्याची रक्कम वाढविण्याची गरज असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. सध्या गृहआधार योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा १,५०० रुपये आर्थिक मदत थेट बँक खात्यात दिली जाते. दयानंद सामाजिक सुरक्षा योजनेत लाभार्थ्यांच्या प्रवर्गानुसार मदतीची रक्कम वेगवेगळी आहे.

ज्येष्ठ नागरिक, एकल महिला आणि प्रौढ दिव्यांग व्यक्तींना साधारण २,००० रुपये प्रतिमाह, विधवांना २,५०० रुपये, तर ९० टक्क्यांपेक्षा अधिक दिव्यांगत्व असलेल्या लाभार्थ्यांना ३,५०० रुपये प्रतिमाह मदत दिली जाते. दिव्यांग मुलांसाठीही २,५०० रुपयांपर्यंत मदत असून, सातत्याने औषधोपचार घेणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना अतिरिक्त ५०० रुपयांची मासिक वैद्यकीय मदत मिळते.

महागाईचा फटका

गृहआधार आणि दयानंद या दोन्ही योजनांचा मोठा आधार राज्यातील आर्थिकदृष्ट्या गरजू कुटुंबांना मिळतो. मात्र, योजना सुरू झाल्यानंतरच्या काळात अन्नधान्य, औषधे, वीज, घरगुती खर्च आणि इतर जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढल्याने पूर्वीची आर्थिक मदत अपुरी पडत असल्याची भावना लाभार्थ्यांमध्ये आहे. याच पार्श्वभूमीवर सरकारने योजनांच्या रकमेत वाढ करण्याचा निर्णय घेण्याचे संकेत दिले आहेत.

किती वाढ मिळणार?: सरकारी आकडेवारीनुसार २०२३-२४ मध्ये गृहआधार योजनेचे सुमारे १.३५ लाख आणि दयानंद सामाजिक सुरक्षा योजनेचे सुमारे १.३८ लाख लाभार्थी होते. त्यामुळे मासिक मदतीत होणारी वाढ राज्याच्या सामाजिक कल्याणाच्या खर्चावरही मोठा परिणाम करणारी ठरणार आहे. सरकारने वाढीची नेमकी रक्कम अद्याप जाहीर केलेली नसल्याने लाभार्थ्यांचे लक्ष आता सुधारित दराकडे लागले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

October 2026 Rules Change: 1 ऑक्टोबरपासून बदलणार 9 मोठे नियम! खिशाला लागणार कात्री, महागाई आणि बचतीवर होणार परिणाम; सणासुदीच्या तोंडावर आर्थिक झटका

Asian Games 2026: तिरंदाजीत भारताची 'गोल्ड' हॅटट्रिक! पुरुष कंपाउंड संघाने मिळवला रोमांचक विजय; फायनलमध्ये चीनला दिली मात

Kharif Sowing Area Decline: पेरणीखालील क्षेत्र घटले, तरी खरीप उत्पादनाला फटका नाही; रब्बीसाठी केंद्राचे 177.72 दशलक्ष टनांचे लक्ष्य

Lucky Zodiac Signs: राहू-केतूची उलटी चाल ठरणार वरदान! 'या' राशींच्या आयुष्यात येणार सुख, संपत्ती आणि समृद्धी; मिळणार बक्कळ पैसा

Goa Water Crisis: राज्य गंभीर पाणी संकटाच्या दिशेने; सत्तरीतील नद्या सप्टेंबरमध्येच तळाला, 31 टक्के पावसाची तूट

SCROLL FOR NEXT