Gramsabha Dainik Gomantak
गोवा

Gramsabha: राज्यातील ग्रामसभा तापल्‍या, सांताक्रूझ ग्रामपंचायतीत मटकाबंदीच्‍या विरोधातील ठराव लोकांनी फेटाळला

ग्रामसभा तापल्‍या : अवेडे येथे उपसरपंचांच्‍या पतीला ग्रामस्थाकडून मारहाण

गोमन्तक डिजिटल टीम

Gramsabha बेकायदा बांधकामे, रस्‍त्‍यांची दुर्दशा, खाणप्रश्‍‍न, परप्रांतीयांची वाढती संख्‍या, अतिक्रमणे आदी मुद्यांवरून राज्‍यातील बहुतांश ग्रामसभा आज तापल्‍या. मार्ना-शिवोलीसह राय, आसगाव ग्रामसभेत व्‍हिडिओ रेकॉर्डिंग (चित्रीकरण) करणाऱ्या ‘आरजी’च्‍या कार्यकर्त्यांना ग्रामस्‍थांनी रोखले.

काही ठिकाणी पोलिसांना हस्‍तक्षेप करावा लागला. सांताक्रूझ पंचायत क्षेत्रात सुरू असणाऱ्या बेकायदा मटका-जुगारावर कारवाई व्‍हावी, या उद्देशाने माजी सरपंच मारियानो आरावजो यांनी मांडलेले ठराव ग्रामपंचायतीने बहुमताने हात उंचावून फेटाळला; तर अवेडे येथे उपसरपंचांच्‍या पतीला मारहाण करण्‍यात आली.

सांताक्रूझ परिसरात चालणाऱ्या मटका-जुगारावर कारवाई व्‍हावी, अशी मागणी करत माजी सरपंच मारियानो आरावजो यांनी पंचायतीला निवेदन दिले होते. आज झालेल्या ग्रामसभेत मटकाबंदीच्या निवेदनावर बराच खल झाला.

उपस्‍थित ग्रामस्थांनी मटकाबंदीच्‍या विरोधात ठराव घेण्यास नकार दिला. मात्र, आरावजो यांनी हा ठराव घेण्यास भाग पाडले. परंतु, बहुसंख्‍य ग्रामस्‍थांनी तो हात उंचावून फेटाळला.

सरपंच जेनिफर ओलिव्हेरा ह्या पहिल्‍यापासूनच ठरावाच्‍या विरोधात होत्‍या. उपसरपंच विनासिओ डॉम्‍निक परेरा यांनीही त्‍यांना समर्थन दिले.

‘हा प्रश्‍न पंचायतीच्या अखत्यारीत येत नाही. आरावजो यांनी कारवाईसाठी पोलिसांकडे तक्रार द्यावी’, असे सांगण्‍यात आले. ‘ज्या ठिकाणी बेकायदा मटका व्यवसाय सुरू आहे, त्याची माहिती आरावजो यांनी दिल्यास योग्य ती दखल घेतली जाईल’, अशी ग्‍वाही सरपंच ओलिव्हेरा यांनी दिली;

पण आरावजो व माजी पंच बाबी नाईक ठराव घेण्याच्‍या मागणीवर ठाम राहिले. मटकाबुकी गब्बर होत आहेत व मटका जुगाराचे व्यसन लागलेले लोक रसातळाला जात आहेत. घराघरांत कलह होत असल्याचे मत त्यांनी मांडले. पण, उपस्थित ग्रामस्थ एकाएकी तापले.

आरावजो हे सरपंच असताना सांताक्रुझमध्ये बेकायदा मटका व्यवसाय सुरू नव्हता का? त्यावेळी त्यांनी कोणती कारवाई केली, असा प्रश्‍न काही ग्रामस्थांनी केला. त्यांची ही मागणी पंचायतीने फेटाळून लावावी, अशी मते अनेकांनी मांडली.

या निवेदनावर पंचायतीने ठराव घ्यावा व जो काही निर्णय असेल तो मान्य असेल, असे आरावजो यांनी सांगितल्यावर पंचायतीने तो ठराव ग्रामसभेत मांडला. त्यानंतर हात उंचावून तो बहुमताने फेटाळण्यात आला.

... आणि वादाचे रूपांतर मारहाणीत

केपे : अवेडे ग्रामसभेत एका ग्रामस्थाने प्रभाग क्रमांक ५मध्‍ये रस्ते ठीक नसल्याने आपली गाडी रस्त्यावरील खड्यात अडकून पडल्‍याचे सांगितले व सदर प्रश्‍‍नी सरपंचांनी लक्ष घालावे, अशी मागणी केली.

प्रभाग ५च्‍या पंच तथा उपसरपंच शिल्पा प्रभुदेसाई यांच्या अनुपस्थित त्यांचे पती गजानन प्रभुदेसाई यांनी सरपंचांनी प्रभाग पाचमध्ये लक्ष घालू नये; त्यांनी आपल्याच प्रभागात पाहावे, असे सांगितले असता साविओ नामक ग्रामस्थाने विधानावर हरकत घेतली. त्याच्याकडून मारहाण झाली.

शिवोलीत पोलिसांचा हस्‍तक्षेप

मार्ना-शिवोली ग्रामसभेत ‘आरजी’चे नेते उद्देश पांगम व अन्य एकाने सभेचे चित्रीकरण करण्याचा प्रयत्न केला असता, मयूर तोरस्कर तसेच सरपंच अभय शिरोडकर यांनी त्यांना रोखले. आरजी कार्यकर्त्यांनी आपण त्‍यासाठी अधिकृत अर्ज केल्‍याचे सांगितले.

बंदोबस्तासाठी उपस्थित पोलिसांनी सभेत हस्तक्षेप करीत परिस्‍थितीवर नियंत्रण मिळवले. तसेच राय व आसगाव येथेही चित्रीकरणाचा प्रयत्‍न झाला. त्‍याला आक्षेप घेण्‍यात आल्‍याने काही काळ तणाव निर्माण झाला.

चित्रीकरण करणाऱ्या ‘आरजी’च्‍या कार्यकर्त्यांना तीन ठिकाणी रोखले

  • मारियानो आरावजो म्हणाले, काही दिवसांपूर्वी मांद्रे पंचायतीमध्ये बेकायदा मटका-जुगाराला बंदी घालण्याचा ठराव घेतला. त्यामुळे सांताक्रूझ पंचायतीने असा ठराव घेण्यास दिलेला नकार योग्य नाही.

  • ग्रामसभेने ठराव फेटाळला असला तरी स्थानिक आमदार, जुने गोवे पोलिस व उत्तर गोवा पोलिस अधीक्षकांकडे सांताक्रूझमध्ये चाललेल्‍या मटक्‍याविरोधात तक्रारी केल्‍या जातील.

  • पंचायतीने मटकाबंदीसाठी पुढाकार घेण्याची गरज होती; मात्र पंचायत मटका-जुगार व्यावसायिकांना प्रोत्साहन देत आहे, असा आरोपही त्यांनी केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rishabh Pant: ऋषभ पंतने सोडले लखनऊ सुपर जायंट्सचे कर्णधारपद! अपयशाची स्वीकारली संपूर्ण जबाबदारी; पण संघात राहणार का?

NEET Paper Leak: 'फक्त बळीचा बकरा बनवून चालणार नाही, खऱ्या मास्टरमांइडला शोधा'; सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकार आणि NTA ला सक्त ताकीद

Budh Gochar 2026: गुंतवणुकीतून बंपर नफा आणि परदेश प्रवासाचा योग! बुधाचे गोचर ठरणार वरदान; 3 राशींवर होणार पैशांचा पाऊस

VIDEO: अंदाज चुकला की चपलेचा सणसणीत दणका! सोशल मीडियावर अतरंगी गेमचा व्हिडिओ व्हायरल; नेटकरी हसून हसून लोटपोट

स्मार्ट चष्म्यांच्या वापरातून फिक्सिंग... आयपीएल फायनलपूर्वी खळबळ, BCCI ॲक्शन मोडमध्ये! 'या' गोष्टीवर घातली बंदी

SCROLL FOR NEXT