Water Tanker Advisory For Goa Dainik Gomantak
गोवा

गोमन्तकीयांनो टँकरद्वारे पाणी मागवताना 'अशी' खबरदारी घ्या, शंका असल्यास 'येथे' साधा संपर्क

टँकरसंदर्भात जलस्त्रोत खात्याकडून अ‍ॅडव्हायझरी जारी

Pramod Yadav

Water Tanker Advisory For Goa: राज्याच्या अनेक भागातील लोकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. पाण्याची समस्या सोडवण्यासाठी लोक टँकरद्वारे पाणी मागवत आहेत. दरम्यान, सरकारच्या वतीने टँकरचे पाणी मागवताना गोमन्तकीयांना खबरदारी घेण्याची मागणी केली आहे. याबाबत जलस्त्रोत खात्याकडून अ‍ॅडव्हायझरी जारी केली आहे.

जलस्त्रोत खात्याची अ‍ॅडव्हायझरी काय सांगते?

- पाणी मागवलेला टँकर सार्वजनिक बांधकाम खात्याने प्रमाणित केलेल्या ठिकाणीच भरलेला आहे की नाही याची खातरजमा करावी.

- टँकरच्या समोरच्या काचेवर भुजल अधिकाऱ्याच्या परवान्याची पत्र चिटकवलेली आहे की नाही याची खात्री करा.

- टँकरची टाकी स्टेनलेस स्टीलची असावी आणि आरोग्य सेवा संचालनालयाकडून प्रमाणित केलेली असावी.

- कोणतीही शंका असल्यास खात्याने क्षेत्रनिहाय भुजल अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांक जारी केले आहेत त्यावर संपर्क करावा

क्षेत्रनिहाय भुजल अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांक जारी

पेडणे, बार्देश आणि तिसवाडी - 9823096258

डिचोली आणि सत्तरी - 9423314359

फोंडा आणि काणकोण - 9420690025

सासष्टी आणि मुरगावसाठी - 9423059015

केपे, सांगे आणि धारबांदोडा - 9420690025

नागरिकांना टँकरसंदर्भात कोणतीही शंका असल्यास वरील नंबरवर संपर्क साधता येईल असे खात्याने म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cricket New Rules: क्रिकेटप्रेमींसाठी खूशखबर! स्टंप्स उडाले तरी फलंदाज आउट होणार नाही, काय आहे नवा नियम? VIDEO

Navpancham Rajyog 2026: शनि-मंगळाच्या नवपंचम राजयोगाची कमाल! 'या' 3 राशींच्या आयुष्यात येणार सोन्याचे दिवस; होणार तगडा धनलाभ

UPI MDR Charge: ऑनलाइन पेमेंट करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, युपीआय पेमेंटवर एमडीआर चार्ज लावण्याचा निर्णय दिवाळीपर्यंत रद्द; NPCI चा मोठा निर्णय

8th Pay Commission Updates: केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात होणार भरघोस वाढ? आयोगाच्या 5 मोठ्या अपडेट्सवर सर्वांचं लक्ष; 'फिटमेंट फॅक्टर'चं सोप्या भाषेत गणित

Goa Cricket: आर्यन नार्वेकरची कर्णधाराला साजेशी खेळी! गोव्याची बडोद्याविरुद्ध 4 बाद 227 धावांपर्यंत मजल

SCROLL FOR NEXT