Karnataka Election 2023 Dainik Gomantak
गोवा

Karnataka Election 2023: का दिली कर्नाटक मतदानाला सुट्टी? गोवा सरकारने कायदा सांगत दिले स्पष्टीकरण

कर्नाटकच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान दिवस म्हणून गोवा सरकारने भरपगारी सुट्टी जाहीर केली आहे.

Pramod Yadav

Karnataka Election 2023 : कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी (दि.10) मतदान होणार आहे. मतदानासाठी गोव्यात कार्यरत असलेल्या कर्नाटकच्या मतदारांसाठी गोवा सरकारने भरपगारी सुट्टी जाहीर केली आहे. यावरून गोवा सरकारवर सर्व स्तरातून टीका होताना दिसत आहे. राज्यातील भाजप सरकारवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

दरम्यान, टीका झाल्यानंतर सरकारने कर्नाटक मतदानादिवशी गोव्यात का सुट्टी दिली. याबाबत गोवा सरकारने स्पष्टीकरण दिले आहे.

कर्नाटकच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 'मतदान दिवस' म्हणून गोवा सरकारने भरपगारी सुट्टी जाहीर केली आहे. लोकप्रतिनिधी कायदा, 1951 च्या कलम 135-बी अंतर्गत ही सुट्टी जाहीर केल्याचे गोवा सरकारने स्पष्ट केले आहे.

लोकप्रतिनिधी कायदा, 1951 च्या कलम 135 - बी अंतर्गत कोणताही व्यक्ती कुठेही काम करत असेल त्याला सार्वत्रिक निवडणुकीला भरपगारी सुट्टी देणे आवश्यक आहे. असेही त्यांनी स्पष्टीकरणात म्हटले आहे.

'कर्नाटक गोव्याचे शेजारी राज्य असल्याने तसेच, मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी केलेल्या विनंतीवरून सुट्टीचा निर्णय घेण्यात आला.'

'गोवा विधानसभा निवडणुकीच्या काळात शेजारील महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यात देखील अशाच पद्धतीने सुट्टी जाहीर करण्यात आली होती.' असेही गोवा सरकारच्या स्पष्टीकरणात म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT