Yuri Alemao On Permission To Liquor Shops near school and temples Dainik Gomantak
गोवा

Goa Congress: शाळा, मंदिराजवळ दारु दुकांनाना परवानगी! युरी आलेमाव म्हणाले, 'तरुणांचे भविष्य उद्ध्वस्त होणार, निर्णय मागे घ्या'

Yuri Alemao On Permission To Liquor Shops near school and temples: सरकारच्या या निर्णयामुळे तरुणांचे भविष्य आणि गोव्याची ओळखच उद्ध्वस्त होईल, अशी चिंता त्यांनी व्यक्त केली.

Pramod Yadav

परवाना शुल्क वाढवून शैक्षणिक संस्था आणि धार्मिक स्थळांच्या 100 मीटर परिसरात दारू दुकानांना परवानगी दिल्याने तरुणांचे भविष्य उद्ध्वस्त होणार आहे, असे म्हणत दारूच्या दुकानांना शाळा आणि मंदिराजवळ परवानगी देणारी अधिसूचना मागे घेण्याची मागणी, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केली आहे.

दिवाळखोर भाजप सरकारने काटकसरीचे उपाय अवलंबून इव्हेंट आयोजनावर होणारा फालतू खर्च बंद करावा, असाही टोला आलेमाव यांनी लगावला आहे. शाळा आणि मंदिरासारख्या ठिकाणांचे पावित्र्य नेहमीच जपले जाणे आवश्यक असल्याचे आलेमाव म्हणाले.

सरकारच्या या निर्णयामुळे तरुणांचे भविष्य आणि गोव्याची ओळखच उद्ध्वस्त होईल, अशी चिंता त्यांनी व्यक्त केली. भाजप सरकारचे मानसिक संतुलन ढासळल्याचे दिसून येत आहे. 'पार्टी विथ अ डिफरन्स' चे सरकार आता सर्व काही वेगळ्या पद्धतीने करतेय, असे आलेमाव यांनी म्हटले.

स्वातंत्र्यसैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांचे श्रद्धास्थान असलेल्या पवित्र आग्वाद तुरूंगाच्या परिसरात मद्यविक्रीला भाजप सरकारने परवानगी दिली. आता शाळा आणि धार्मिक स्थळांच्या जवळ दारु दुकाने आणण्याचा भाजप सरकारचा डाव आहे. भाजप सरकार पैसे कमावण्यासाठी काहीही करेल, असे आलेमाव म्हणाले.

भाजप सरकार गोव्यातील दारू माफियांना आश्रय देत आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केलेल्या गोव्यातून कर्नाटकात अवैध दारूची वाहतूक केली जाते, या विधानाची सरकारला माहितीच नाही. मला विधानसभेत दिलेल्या उत्तरावरून भाजप सरकार दारूच्या अवैध धंद्याकडे जाणीवपूर्वक डोळेझाक करत आहे हे स्पष्ट होते असा दावा युरी आलेमाव यांनी केला आहे.

शिक्षण आणि मंदिरांच्या शेजारी दारूच्या दुकानांना परवानगी देऊन महसूल वाढविण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा दारूचा अवैध व्यापार थांबविण्यावर सरकारने भर दिला पाहिजे, असे युरी आलेमाव म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kadamba Bus Accident: इलेक्ट्रिक कदंब झाली ब्रेकडाऊन, पार्क केलेल्या गाड्यांना दिली धडक; ब्रेक फेल झाल्याचा चालकाचा दावा

Mansion House Cup: चुरशीच्या लढतीत FC शिवोली जिंकली! पेनल्टी शूटआऊटमध्ये नमवले कुडतरी जिमखान्यास

International Literacy Day: 1950मध्ये टुरिंग टेस्ट सुचवली, यंत्राची बुद्धिमत्ता तपासली गेली; AI साक्षर होणं काळाची गरज

Stone Exhibition: दगडात शोधला 'देव'! पर्येच्या परेशने भरवले अनोखे प्रदर्शन

Sonali Phogat Murder Case: सोनाली फोगाट खून प्रकरणातील आरोपीला विदेशात जाण्याची परवानगी; बायकोचा वाढदिवस साजरा करण्यासाठी इंडोनेशियाला जाणार

SCROLL FOR NEXT