Governor - Pillai Dainik Gomantak
गोवा

Governor Sreedharan Pillai: सनातन धर्माबद्दल जाणीवपूर्वक वादग्रस्त विधाने

सनातन धर्म ही भारताची सांस्कृतिक परंपरा आहे- राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई

गोमन्तक डिजिटल टीम

Governor P.S. Sreedharan Pillai

सनातन धर्म ही भारताची प्राचीन, सांस्कृतिक परंपरा असून, ती केवळ धार्मिकतेशी निगडित नसून विश्‍वव्यापक आहे. मात्र, याबाबत काही लोक जाणीवपूर्वक वादग्रस्त विधाने करत आहेत ती करू नयेत, असे मत राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी व्यक्त केले.

तमिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांचे पुत्र उदयनिधी यांनी सनातन धर्म हा विषाणू असून तो कायमस्वरूपी नष्ट केला पाहिजे, असे विधान केले होते. यावर आज राज्यपाल पिल्लई म्हणाले, धर्म आणि धार्मिकता या वेगवेगळ्या बाबी आहेत.

सनातन म्हणजे कायमस्वरूपी अशी शाश्वत बाब होय! आणि सनातन धर्म ही भारताची सांस्कृतिक परंपरा आहे. दक्षिणेतील काही लोक जाणीवपूर्वक वादग्रस्‍त वक्‍तव्‍ये करत असून सनातन धर्माविरोधात बोलत आहेत.

त्‍यांनी अशी विधाने करू नयेत. माझी त्यांना विनंती आहे की, सर्वप्रथम देश ही भावना बळकट केली पाहिजे आणि त्यानंतरच धर्म आणि राजकारण यांवर बोलावे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: "एनडीएला बळ देण्यासाठीच प्रवेश", 7 खासदारांच्या पक्षांतरावर कीर्तीकरांचे विधान

Padma Shri Prasad Sawkar: आठवणीत वसलेले प्रसाद सावकार

आगामी निवडणुकांमध्ये तरुणांसह महिलांना देणार संधी! 'जेनझी'शी राजकीय 'कनेक्ट' गरजेचा- विजय सरदेसाई

Goa Politics: भाजप सरकारचा अहंकार जनता मोडेल! अरविंद केजरीवालांची टीका, कारापूर आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतल्याचा केला निषेध

Section 39A Protest: आता गावागावांतून आंदोलन! कलम '39अ'विरोधात आमदार वीरेश बोरकर यांची घोषणा

SCROLL FOR NEXT