Clams Shell Fish Dainik Gomantak
गोवा

Guidelines for Fishing: खुबे, शेलफिशच्या मासेमारीबाबत मार्गदर्शक तत्वे जारी

चिखली, सांकवाळ भागात अतिमासेमारीवर राज्यसरकारच आणणार नियंत्रण

गोमन्तक डिजिटल टीम

Guidelines for Fishing: गोव्यातील नद्या आणि किनारी प्रदेशात खुबे (Clams) आणि शेलफिशची (Shellfish) मासेमारी अतिप्रमाणात होऊ नये यासाठी राज्य सरकारने मार्गदर्शक तत्वे (Guidelines) जारी केली. याद्वारे या माशांच्या मासेमारीवर (Fishing) लक्ष ठेवले जाणार असून त्याचे नियमन केले जाणार आहे. चिखली आणि सांकवाळ या भागात जैव विविधतेचे संवर्धन करण्यासाठी तसेच या माशांच्या अतिमासेमारीवर बंधने आणण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे.

मार्गदर्शक तत्वे ठरविण्यासाठी स्थानिक जैवविविधता व्यवस्थापन समितीचे (बीएमसी) अध्यक्ष आणि इतर सदस्यांची मदत घेतली गेली आहे. जोपर्यंत मस्त्यविभागाकडून कायदेशीर मसुदा तयार केला जात नाही तोपर्यंत स्थानिक जैवविविधता व्यवस्थापन समित्या, गोवा स्टेट बायोडायव्हर्सिटी बोर्ड (GSBB) आणि मत्स्य मंत्रालय यांच्याशी सल्ला-मसलत करून जिथे गरज असेल तिथे तसेच संपुर्ण राज्यभरात ही मार्गदर्शक तत्वे लागू केली जाऊ शकतात.

पारंपरिक पद्धतीनेच व्हावी मासेमारी

जैवविविधतेच्या रक्षणासाठी स्थानिकांची स्थिती उत्तम हवी, या धारणेतून ही मार्गदर्शक तत्वे बनवली आहेत. तथापि, स्थानिक लोक जैवविविधतेचे संवर्धन तेव्हाच करतील जेव्हा ही जैवविविधता त्यांच्या जीवनाशी, उपजिविकेशी निगडीत असेल आणि त्यातून लोकांचा लाभ होईल. सध्या उपलब्ध खुबे माशांची मासेमारी केवळ 5 किलोमीटर परिघातील स्थानिकांकडूनच आणि हाताने पकडण्याच्या पारंपरिक पद्धतीनेच व्हावी. तसेच नदीपलीकडील बाजूचा यात समावेश नसेल.

लहान माशांची मासेमारी नको

मार्गदर्शक तत्वातील शिफारसींमध्ये म्हटले आहे की, तीन सेंटीमीटरहून कमी लांबीचे खुबे मासे पकडण्यास परवानगी नसावी, अधिसूचनेत म्हटले आहे की, या अधिवासांमध्ये प्रजनन सुलभ करण्यासाठी दरवर्षी जुलै ते ऑक्टोबर महिन्यांत मासेमारीस बंद करावी. मासेमारी करतानाही ज्यावर शिंपले, ऑयस्टर्स वाढतात अशा खडकांसारख्या अधिवासाला धक्का बसू नये, याची दक्षता घ्यावी.

संवेदनशील झोनमध्ये पर्यटकांना प्रतिबंध करावा

एप्रिल-मे या महिन्यात राज्यातील पर्यटन हंगाम बहरात बसतो. या काळात या अधिवासांमध्ये संवेदनशील झोनमध्ये पर्यटकांना प्रतिबंध केला जावा. त्यांच्या वावरामुळे माशांच्या निवासस्थानात बदल होतो, पाण्याची गुणवत्ता बिघडते ते खुबे माशांच्या मृत्यूला कारणीभूत ठरते. संवर्धनाच्या दृष्टीने असुरक्षित असलेल्या झोनचे व्यवस्थापन स्थानिक लोकांकडून व्हायला हवे. त्यातून अती मासेमारीवर बंधने आली पाहिजेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Calangute: दारुच्या नशेत टाईट पर्यटकाचा कळंगुटमध्ये राडा; नग्न होऊन रस्त्यात झोपला, टॅक्सीवर उभारला

Rashi Bhavishya 23 November 2024: नोकरीत बढतीची संधी अन् बेरोजगारांनाही दिलासा... 'या' दोन राशींच्या लोकांचा विशेष दिवस!

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

SCROLL FOR NEXT