AAPAR ID  Dainik Gomantak
गोवा

AAPAR ID: विद्यार्थ्यांसाठी महत्वाचं!! गोव्यात बनणार 12 अंकी AAPAR ID

AAPAR ID for Students: राज्यातील सर्व शालेय प्रवेशित विद्यार्थ्यांसाठी APAAR ID तयार केला जाणार

गोमन्तक डिजिटल टीम

APAAR ID Goa Student Education Department

पणजी : गोवा सरकारकडून राज्यातील सर्व शालेय प्रवेशित विद्यार्थ्यांसाठी ऑटोमेटेड परमनंट ॲकॅडमिक अकाउंट रजिस्ट्री (APAAR ID) हा 12 अंकी ओळख क्रमांक तयार केला जाणार आहे. न्यू एज्युकेशन पॉलिसीच्या अंतर्गत 'वन नेशन, वन स्टुडंट आयडी' या उपक्रमाचा भाग म्हणून सरकारकडून ही मोहीम चालवली जाईल.

शिक्षण संचालक शैलेश झिंगाडे यांनी दिलेल्या माहितीनुसार APAAR आयडीचा वापर करून सरकारी आणि खासगी शाळांमध्ये शिक्षण घेण्याऱ्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा मागोवा घेतला जाईल, त्यांच्या शैक्षणिक कार्यक्रमात येणाऱ्या महत्वाच्या नोंदी ठेवल्या जातील आणि यानुसार आवश्यक मदत आणि मार्गदर्शन प्रदान केले जाईल.

APAAR आयडी आधार कार्डशी जोडणार

प्रत्येक विद्यार्थ्याचा युनिक APAAR आयडी त्याच्या आधार कार्ड आणि डिजीलॉकरशी जोडला जाईल. यामुळे विद्यार्थ्यांना त्यांचे निकाल, रिपोर्ट कार्ड, ऑलिम्पियाड अचिव्हमेंट्स, क्रीडा पुरस्कार आणि कौशल्य प्रशिक्षण रेकॉर्ड डिजिटली स्टोअर आणि ऍक्सेस करता येतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Chandragrahan 2025: धनलाभ की नुकसान? भाद्रपद पौर्णिमेचे चंद्रग्रहण 'या' राशींसाठी ठरू शकते अशुभ; 12 राशींवर काय होईल परिणाम?

Viral Video: विशाल देह पण कोमल मन...! हत्तीणीचा इमोशनल व्हिडिओ व्हायरल, माणसावरील प्रेम पाहून यूजर्संना अश्रू अनावर

Bambolim Cancer Centre: ''बांबोळीचे कॅन्सर सेंटर निवडणुकीच्या आधी तयार होणार'' आरोग्यमंत्र्यांचा दावा!

Shreyas Iyer Captain: आशिया कपपूर्वी श्रेयस अय्यरकडे कर्णधारपद, भारताचा संघ जाहीर

Cuncolim Fish-Meal Plant: कुंकळ्ळीतील प्रदूषणाबाबत आलेमाव यांचं मुख्यमंत्र्यांसह उद्योगमंत्र्यांना पत्र, नव्या फिश मिल प्लांटची परवानगी रद्द करण्याची केली मागणी

SCROLL FOR NEXT