Goa Governor Dainik Gomantak
गोवा

Goa Governor : गोमंतकीयांनी मातृभाषेला प्रथम प्राधान्य देण्याची गरज

कोकणीच्या प्रसारासाठी प्रयत्न करणार असल्याची राज्यपाल पिल्लईंची घोषणा

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Governor : मातृभाषेला प्रथम प्राधान्य देण्यात यावे आणि कोकणी भाषेच्या संवर्धनासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करणार असल्याचे राज्यपाल श्रीधर पिल्लई यांनी सांगितले. राज्यपाल पिल्लई आज मुरगाव तालुक्याच्या दौऱ्यावर आले असता प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते. देशात चार राज्यांत कोकणी भाषेचा प्रभाव आहे. कोकणी ही गोव्याची मातृभाषा आहे. त्याचा मी आदर करतो, असे ते म्हणाले. पंचायत निवडणुकीनंतर तसेच मतमोजणीनंतर मी पुन्हा एकदा गोवा भ्रंमती चालू केली असून देवाला वाटले, तर सहा महिन्यांत गावे आणि पंचायतींना भेटी देईन, असे राज्यपाल पिल्लई यांनी सांगितले. यावेळी त्यांनी कुठ्ठाळीचे आमदार आंतोन वाझ यांनी कोकणी भाषेतून भाषण केल्याबद्दल त्यांनी स्तुती केली. त्यांनी आपल्या मातृभाषेचा आदर ठेवला असल्याचे ते म्हणाले.

मुरगाव तालुक्यातील सात पंचायतींच्या सरपंच व पंच सदस्यांच्या भेटीदाखल राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई एक दिवसाच्या मुरगाव तालुक्यातील पंचायत दौऱ्यावर होते. यावेळी चिखली पंचायत सभागृहात तसेच उपासनगर - सांकवाळ येथे कला भवन आयोजित सरपंच व पंच सदस्यांबरोबर वार्तालाप कार्यक्रमात भाग घेतला.

यावेळी त्यांच्या समवेत व्यासपीठावर पंचायतमंत्री माविन गुदिन्हो, जिल्हा पंचायत सदस्य अनिता थोरात, चिखलीचे सरपंच कमला प्रसाद यादव, सरपंच संकल्प महाले होते.

संविधानात नागरिकच सर्वोच्च

लोकशाहीत लोकांनी निवडून दिलेले आपण लोकप्रतिनिधी असून लोक सर्वोच्च आहेत. लोकांची सेवा करण्यासाठी आम्हाला लोकांनी निवडून दिलेले आहे. संविधानात लोक सर्वोच्च आहेत. लोकांच्या सेवेत सदैव तत्पर राहून लोकांची ऑफर स्वीकारा, असा सल्ला गोवा राज्याचे राज्यपाल पिल्लई यांनी मुरगाव तालुक्यातील सातही पंचायतीतील निवडून आलेल्या पंच सदस्यांना दिला.

सरपंच, पंचांशी राज्यपालांचा संवाद

संध्याकाळच्या सत्रात राज्यपाल श्रीधरन पिल्लई यांनी उपासनगर - सांकवाळ येथील कलाभवन सभागृहात सांकवाळ, कुठ्ठाळी, केळशी कासावली, वेलसाव पंचायतीच्या सरपंच, पंच सदस्यांशी वार्तालाप केला. यावेळी त्यांनी आपल्या लोकांची सेवा करताना गावाची सौंदर्यता सांभाळण्याचा सल्ला दिला. लोकांनी निवडून दिलेले आपण लोकप्रतिनिधी असून समाजाप्रती कार्यात झोकून द्यावे. आपण लोकांचे नोकर असून सर्वप्रथम गावच्या लोकांची सेवा करावी, असा सल्ला त्यांनी दिला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT