Goa Civil Service Transfers Dainik Gomantak
गोवा

Goa Civil Service Transfers: गोवा नागरी सेवेत फेरबदल! गुरुदास देसाई यांची जिल्हाधिकारीपदी वर्णी तर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या

Kushavati District Collector: गोवा मनुष्यबळ विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदाचा अतिरिक्त कार्यभारही कायम ठेवण्यात आला आहे.

दैनिक गोमन्तक डिजिटल

पणजी: राज्य सरकारने वरिष्ठ श्रेणीतील गोवा नागरी सेवा अधिकाऱ्यांच्या बदल्या व नियुक्त्यांचे आदेश जारी केले असून, उत्तर गोव्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी-१ म्हणून कार्यरत गुरुदास एस. टी. देसाई यांची नव्याने स्थापन झालेल्या कुशावती जिल्ह्याच्या जिल्हाधिकारीपदी बदली करण्यात आली आहे.

त्यांच्याकडे गोवा मनुष्यबळ विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदाचा अतिरिक्त कार्यभारही कायम ठेवण्यात आला आहे. हा आदेश तत्काळ प्रभावाने लागू करण्यात आला आहे. या बदल्यांमध्ये उत्तर गोव्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी-२ प्रवीण हिरे परब यांची उत्तर गोव्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी-१ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

तसेच, पोलिस महासंचालक कार्यालयातील प्रशासन संचालक अक्षय जी. पोटेकर यांची उत्तर गोव्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी-२ म्हणून बदली करण्यात आली आहे. दरम्यान, नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या सॅन्ड्रा डिसोझा यांची पोलिस महासंचालक कार्यालयात प्रशासन संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

त्यांच्याकडे कामगार व रोजगार विभागाच्या उपसंचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार पुढील आदेशापर्यंत कायम राहणार आहे. उपमुख्य निवडणूक अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या प्राजक्ता डी. गोलतेकर यांची तांत्रिक शिक्षण संचालनालयात उपसंचालक (प्रशासन) म्हणून बदली करण्यात आली असून, त्यांच्याकडे कायदेशीर मापनशास्त्र विभागाच्या उपसंचालक (प्रशासन) पदाचा अतिरिक्त कार्यभारही सोपविण्यात आला आहे.

मामलेदारांच्याही बदल्या

सरकारने मामलेदारांच्याही बदल्या केल्या आहेत. पेडण्याचे मामलेदार रणजित साळगावकर यांच्याकडे त्यांच्या नियमित कामकाजासोबत संयुक्त मामलेदार-३, पेडणे या पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे. बदली झालेल्या अधिकाऱ्यांची नावे अशी : प्रवीण गावस (उत्तर गोवा जिल्हाधिकारी कार्यालयातील मामलेदार), कार्ला कॉन्स्टॅन्सिओ परेरा (संयुक्त मामलेदार-१, पेडणे), अभिषेक नाईक (संयुक्त मामलेदार-२, फोंडा), सिद्धी पै आंगले (संयुक्त मामलेदार-१, फोंडा), उर्वशी नाईक (संयुक्त मामलेदार-३, फोंडा).

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT