Atal Setu On Mondovi River Panjim Dainik Gomantak
गोवा

Goa Bridges: गोव्यातील पूल किती सुरक्षित? सरकार 17 कोटी खर्चून करतंय 1000 पूलांचे सर्वेक्षण

Bridges In Goa: बाणस्तारी पूल, मांडवी नदीवरील पूल तसेच कोलवाळ पूल ते लहान पूलांचे ऑडिट केले जाणार आहे.

Pramod Yadav

Bridges In Goa

पणजी: गोव्यातील लहान, मोठ्या एक हजार पूलांचे सर्वेक्षण केले जाणार आहे. मुंबईतील स्ट्रक्टवेल फर्मची यासाठी नियुक्ती करण्यात आली असून, लवकरच कामाला सुरुवात होणार आहे. उत्तर आणि दक्षिण गोव्यातील हजार पूलांचे सर्वेक्षण, ऑडिट आणि जिओ टॅगिंग केले जाणार आहे.

काम स्वीकारल्याचे पत्र सार्वजनिक बांधकाम खात्याच्या वतीने नुकतेच स्ट्रक्टवेल फर्मला देण्यात आले. उत्तर आणि दक्षिण गोव्यातील १०० मोठे आणि ९०० लहान पुलांचे सर्वेक्षण, ऑडिट आणि जिओ टॅगिंग केले जाणार आहे.

१८० दिवसांच्या या कामासाठी १७ कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. गोव्यात पहिल्यांदाच संयुक्त पद्धतीने एवढ्या मोठ्या प्रमाणावर पूलांचे सर्वेक्षण केले जात आहे. पूलाचे ऑडिट करण्यासाठी पेनिट्रेटींग रडार, ड्रोन्स, अंडर वॉटर टेस्टिंग आणि एन्डोस्कोपिक पद्धतींचा वापर करण्यात येईल.

बाणस्तारी पूल, मांडवी नदीवरील पूल तसेच कोलवाळ पूल ते लहान पूलांची पाहणी व तपासणी केली जाणार आहे. राज्यात अशाप्रकारची दोन हजार स्ट्रक्चर आहेत.

यातील काही १९७० दरम्यान उभारण्यात आले आहेत. या पूलांची वेळोवेळी दुरुस्ती आणि देखभाल करण्यात आल्याची माहिती आहे. सर्वेक्षणानंतर पूलाची दुरुस्ती, देखभाल किंवा आवश्यक इतर कामांबाबत सार्वजनिक बांधकाम खाते निर्णय घेणाराय.

तसेच, पूलाची वजन वहन क्षमता देखील तपासली जाणार आहे. यामुळे अवजड वाहनांना पुलावरुन प्रवेश द्यायचा की नाही याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.

सर्वेक्षणानंतर राज्यातील पूलांबाबत घ्यायच्या सुरक्षात्मक उपयांचा देखील विचार केला जाणार आहे. गरज भासल्यास कार्बन फायबर रॅपिंग, ग्लास लॅमिनेशन, कार्बन लॅमिनेशन यांचा उपयोग केला जाणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Accident Death: दारूची नशा बेतली जीवावर; दुचाकीवरील ताबा सुटला, नाल्यात पडून 30 वर्षीय युवकाचा मृत्यू

Bank Job: SBI मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! 12,000 जागांसाठी होणार मेगाभरती, 250 नव्या शाखा सुरू करण्याचा बँकेचा प्लॅन

Congress Dalit Tribal Support: दलित-आदिवासींची साथ मिळवणे काँग्रेससाठी सोपे नाही! राहुल गांधींसमोर मोठे राजकीय आव्हान

Goa Assembly Session: गोवा विधानसभेचा 'खेळखंडोबा'! सत्ताधारी-विरोधकांच्या राजकारणात राज्याच्या भवितव्याचा विसर

Dabolim Dubai Flight: दाबोळी-दुबई विमानसेवा पुन्हा सुरू होणार, दररोज एक उड्डाण; मुंबई-गोवा मार्गावरही दिवसाला 8 फेऱ्या

SCROLL FOR NEXT