Goa Mining Dainik Gomantak
गोवा

Goa Mining: खाण बंदीमुळे बाधित झालेल्या भागात 177 कोटी रुपये खर्च करणार गोवा सरकार

खाणकाम बंदीचा फटका बसलेल्यांना होणार लाभ

Akshay Nirmale

Goa Mining: खाण आणि भूविज्ञान संचालनालयाने (DMG) राज्यातील खाणकाम बंद झाल्यामुळे ज्या लोकांना फटका बसला आहे, त्यांच्यासाठी लाभदायी प्रकल्प राबवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी राज्यात खाणकाम बंदीमुळे बाधित झालेल्या भागात एकूण 177 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.

DMG ने नॉर्थ गोवा डिस्ट्रिक्ट मिनरल फाउंडेशन ट्रस्ट (NGDMFT) आणि दक्षिण गोवा डिस्ट्रिक्ट मिनरल फाउंडेशन ट्रस्ट (SGDMFT) सोबत काम करण्यासाठी राज्य स्तरावर प्रोजेक्ट मॅनेजमेंट युनिट (PMU) समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे.

DMF ट्रस्टने 2015 मध्ये राज्यात प्रकल्प सुरू केले. प्रभावित क्षेत्रांना लाभ देणारे प्रकल्प शोधणे, तसे प्रस्ताव पाठवणे, समुदायाचे हितसंबंध जपणे, डेटा व्यवस्थापन आणि अहवाल यासाठी विविध विभागांशी समन्वय पीएमयू समन्वय साधेल.

आतापर्यंत, SGDMFT ने 24 प्रकल्पांसाठी 27 कोटी रुपये आणि NGDMFT ने 31 प्रकल्पांसाठी 48.5 कोटी रुपये मंजूर केले आहेत. SGDMFT कडे सध्या 91 कोटी रुपये आहे, तर NGDFT कडे 86 कोटी रुपये आहेत.

पीएमयू जिल्ह्यातील पंचायत, जिल्हा पंचायत आणि शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांकडून आलेल्या प्रस्तावांची तपासणी करेल.

सरकारी विभाग, मंडळे, कॉर्पोरेशन आणि राज्य किंवा केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम किंवा व्यक्तींकडून यापैकी कोणत्याही एजन्सीद्वारे प्रस्ताव पाठवावे लागतील.

PMU दिलेल्या कालावधीत प्रस्तावित योजना आणि प्रकल्पांसह वार्षिक योजना आणि वार्षिक बजेट आणि ट्रस्टचे समन्वय, एकत्रीकरण याचा अहवाल तयार करेल. राज्याने दोन्ही जिल्ह्यात खनिज फाउंडेशन ट्रस्टची स्थापना केली.

जिल्हा खनिज निधी (DMF) खाणकामाशी संबंधित कामांमुळे प्रभावित झालेल्या लोकांना आणि क्षेत्रांना फायदा मिळावा या उद्देशाने स्थापन केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

रस्त्यावर चूल मांडणं पर्यटकांना भोवलं, ना पोट भरलं, ना खिशाला परवडलं!! वाचा नेमकं काय घडलं?

LIC Scheme: दिवाळीपूर्वी 'एलआयसी'ची मोठी भेट, 15 ऑक्टोबरपासून सुरु करणार 2 खास योजना; जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स

मडगाव रवींद्र भवनचे नूतनीकरण अंतिम टप्प्यात; 30 ऑक्टोबरपर्यंत काम पूर्ण! Video

'Mhaje Ghar Yojana: 'माझे घर'ला विरोध करणाऱ्यांना जवळ करू नका!- मुख्यमंत्री

Gold Price: ऐतिहासिक दरवाढ! धनत्रयोदशीपूर्वी सोन्याने केला मोठा धमाका, 10 ग्रॅम सोन्याचा भाव 130000 लाखांच्या पार

SCROLL FOR NEXT