Cancer Research Center Dhargalim Dainik Gomantak
गोवा

Cancer Research Center: 'कॅन्सर संशोधन केंद्रासाठी जमीन उपलब्ध करणार'! CM सावंतांची घोषणा; राज्याला फायदा होण्याचा केला दावा

Cancer Research Center Dhargalim: आयुष मंत्रालय इस्पितळाच्या कॅन्सर संशोधन केंद्रात प्रयोगशाळा, फार्मसी आणि इतर प्रगत सुविधा उभारण्यासाठी गोवा सरकार अतिरिक्त जमीन उपलब्ध करून देईल.

गोमन्तक डिजिटल टीम

पेडणे: धारगळ येथील केंद्रीय आयुष मंत्रालय इस्पितळाच्या कॅन्सर संशोधन केंद्रात प्रयोगशाळा, फार्मसी आणि इतर प्रगत सुविधा उभारण्यासाठी गोवा सरकार अतिरिक्त जमीन उपलब्ध करून देईल. या केंद्राचा राज्याला मोठा फायदा होणार आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.

आयुष इस्पितळातील नव्या ओपीडींचे आज उदघाटन केल्यानंतर ते बोलत होते. केंद्रीय आयुष मंत्रालयाने या इस्पितळात कॅन्सर संशोधन विभागासाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. त्यासंदर्भात मुख्यमंत्री सावंत यांनी ही घोषणा केली.

याप्रसंगी केंद्रीय आयुषमंत्री प्रतापराव जाधव, अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानचे संचालक प्रदीप कुमार प्रजापती, डीन डॉ. सुजाता कदम आणि मान्यवर उपस्थित होते. कॅन्सर संशोधन केंद्रासाठी अतिरिक्त जागा देण्याचे मान्य केल्याबद्दल केंद्रीय आयुषमंत्री प्रतापराव जाधव यांनी मुख्यमंत्री सावंत यांचे आभार मानले. आयुष मंत्रालयाचे सचिव व्ही. राजेश कोटे यांनीही मनोगत व्यक्त केले.

गोमंतकीयांना ५० टक्के जागा

मुख्यमंत्री म्हणाले, की या इस्पितळात देश-विदेशातील लोक वैद्यकीय सेवेचा लाभ घेतात. म्हापसा ते आयुष इस्पितळापर्यंत नवीन कदंब बस सुरू करण्यात येणार आहे. या इस्पितळात वैद्यकीय प्रशिक्षणासाठी पन्नास टक्के जागा गोमंतकीयांसाठी राखीव ठेवल्या आहेत. नव्याने सुरू केलेले सुश्रुत ओटी कॉम्प्लेक्स हे अत्याधुनिक उच्च दर्जाचे तंत्रज्ञान आहे. त्याचा रुग्णांना फायदा होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pilots Dope Test: वैमानिकांची आता वर्षातून एकदा होणार 'डोप टेस्ट'! DGCA लागू करणार नवा नियम; जाणून घ्या काय आहे नवा प्लॅन?

Headland Sada: पोस्ट खात्याची सदनिका बनली शेळ्यांचा निवारा! वर्षानुवर्षे दुर्लक्षामुळे सरकारी इमारत जीर्ण; भंगारवाल्याचाही शिरकाव

Lucky Zodiac Signs 2026: बुधाचे मघा नक्षत्रात गोचर! 'या' लकी राशींवर होणार पैशांचा पाऊस, रक्षाबंधनापर्यंत जॅकपॉट

Colvale Electricity Bills: कोलवाळात वीज बिले दुप्पट-तिप्पट! ग्राहकांना 17 हजारांपर्यंत बिलांचा फटका, फेरपडताळणीची मागणी

Tarun Tejpal Case: तरुण तेजपालला सुप्रीम कोर्टाचा दणका! अधिक वेळ देण्याची याचिका फेटाळली; दोन आठवड्यांत आत्मसमर्पणाचे निर्देश

SCROLL FOR NEXT