Lottery  X
गोवा

Goa Lottery: गोमंतकीयांसाठी खूशखबर! दररोज 15 लाख रुपये जिंकण्याची संधी; 3 कोटींची तिकिटे

Goa Government Lottery: सुमित ऑनलाईन ट्रेड सोल्‍युशन्सकडे या तिकिटांची गोव्‍यासह महाराष्ट्र, पंजाब, सिक्कीम येथे विक्री करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

Sameer Panditrao

पणजी: गोवा सरकारने मार्चपासून लॉटरीच्या व्यवसायात पूर्ण क्षमतेने उतरण्याचे ठरविले आहे. दररोज १५ लाख रुपयांचे पहिले बक्षीस देणाऱ्या या लॉटरीचा निकाल ३ मार्चपासून दररोज रात्री ८.३० वाजता जाहीर केला जाणार आहे.

सरकारच्या लघुबचत व सोडत संचालनालयाने या लॉटरीसाठी वेगवेगळी नावे दिली आहेत. आठवड्यात दररोज ३ कोटी रुपयांची १० लाख लॉटरी तिकिटे विकली जातील असे गृहीत धरून सारी रचना करण्यात आली आहे. सुमित ऑनलाईन ट्रेड सोल्‍युशन्सकडे या तिकिटांची गोव्‍यासह महाराष्ट्र, पंजाब, सिक्कीम येथे विक्री करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

राजश्री ३० सोम साप्ताहिक लॉटरी (३ मार्चपासून दर सोमवारी ८.३० वाजता निकाल). या लॉटरीतून सरकारला ३ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळणार आहे. त्यातून वस्तू व सेवा कर वजा करता निव्वळ २ कोटी ३४ लाख ३७ हजार ५०० रुपयांचा महसूल मिळेल. महाराष्ट्र, पंजाब, सिक्कीमसह गोव्यात या लॉटरीची तिकिटे विकली जातील. या लॉटरीचे पहिले बक्षीस १५ लाख रुपयांचे आहे. एकूण बक्षिसांची रक्कम १ कोटी १८ लाख ४ हजार ५०० रुपये आहे.

राजश्री ३० मंगल साप्ताहिक लॉटरी (४ मार्चपासून दर मंगळवारी ८.३० वाजता निकाल). या लॉटरीची १० लाख तिकिटे विकली जातील. प्रत्येक तिकिटाची किंमत ३० रुपये असेल. या लॉटरीचे पहिले बक्षीस १५ लाख रुपयांचे आहे. राजश्री ३० बुध साप्ताहिक लॉटरीचे तिकीट ३० रुपयाला मिळेल. यातूनही ३ कोटी रुपये मिळतील. (५ मार्चपासून दर बुधवारी ८.३० वाजता निकाल). या लॉटरीचे पहिले बक्षीस १५ लाख रुपये असेल.

राजश्री ३० गुरू साप्ताहिक लॉटरी (६ मार्चपासून दर गुरूवारी ८.३० वाजता निकाल). १ लाख १८ हजार ४ हजार ५०० रुपयांची ४८ हजार ११० बक्षिसे या लॉटरीच्या माध्यमातून दिली जातील. राजश्री ३० शुक्र साप्ताहिक लॉटरी (७ मार्चपासून दर शुक्रवारी ८.३० वाजता निकाल). या तिकिटाचे मूल्य ३० रुपये असून १० हजार तिकिटे विकली जाणार आहेत. यासुद्धा लॉटरीचे पहिले बक्षीस १५ लाख आहे. राजश्री ३० शनी साप्ताहिक लॉटरीचा निकाल ८ मार्चपासून दर शनिवारी रात्री ८.३० वाजता जाहीर केला जाणार आहे.

दररोज १ कोटी १८ लाखांपेक्षा जास्‍त बक्षिसे

लॉटरीचे पहिले बक्षीस १५ लाख रुपयांचे असेल. नऊ हजार रुपयांची १००, दोन हजार रुपयांची एक हजार, एक हजार रुपयांची दोन हजार, १२० रुपयांची ४५ हजार तर ५०० रुपयांची ९ मिळून १ कोटी १८ लाख ४ हजार ५०० रुपयांची ४८ हजार ११० बक्षिसे दिली जाणार आहेत.

सरकारला दररोज मिळतील ६५ लाख ६२ हजार रुपये

या लॉटरी विक्रीतून दररोज ३ कोटी रुपये जमा होतील. त्यातून सरकारच्या खजिन्यात दररोज ६५ लाख ६२ हजार ५०० रुपयांचा वस्तू व सेवा कर जमा होणार आहे. यामुळे लॉटरीचा निव्वळ महसूल २ कोटी ३४ लाख ३७ हजार ५०० रुपये असेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT