Goa Government: उपमुख्यमंत्री चंद्रकांत उर्फ बाबू कवळेकर

 

Dainik Gomantak

गोवा

कृषिप्रधान राज्य बनविण्याचे गोवा सरकारचे ध्येय

उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर : संचलनात काणकोण जवाहर नवोदय विद्यालय प्रथम

दैनिक गोमन्तक

सासष्टी: गोवा कृषिप्रधान राज्य बनविण्याचे सरकारचे ध्येय आहे. त्यासाठी सरकारने (Goa Government) शेतकऱ्यांसाठी अनेक योजना कार्यान्वित केल्या आहेत. केंद्र सरकारच्या अनेक कृषी योजनांचा लाभ राज्यातील शेतकऱ्यांना मिळवून दिला आहे. नवी पिढी शेतीकडे वळत आहे, ही एकदम चांगली गोष्ट असल्याचे उपमुख्यमंत्री चंद्रकांत उर्फ बाबू कवळेकर (Shri Chandrakant Babu Kavlekar) यांनी सांगितले.

गोवा (Goa) मुक्तीच्या 60 व्या वर्धापनदिनानिमित्त दक्षिण गोवा जिल्हाधिकारी संकुलात झेंडावंदन केल्यावर व पोलिसांकडून मानवंदना स्‍वीकारल्यावर ते बोलत होते.

शेतकऱ्यांना (Farmer) शेती विषयक साधने विकत घ्यायला किंवा सरकारी अनुदान मिळविण्यासाठी एट सोर्स सुविधा तसेच सामूहिक शेती योजना मिळवून दिल्या आहेत.

उपमुख्यमंत्री कवळेकर यांचे दक्षिण गोवा जिल्हाधिकारी रुचिका कटियाल, पोलिस अधीक्षक अभिषेक धनिया यांनी स्वागत केले. पोलिस निरीक्षक कपिल नायक यांच्या समवेत त्यांनी परेडची पाहणी केली. त्‍यानंतर वेगवेगळ्या संस्था, शाळांनी मनोरंजन व सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. संचलनात काणकोण (Canacona) येथील जवाहर नवोदय विद्यालयाला प्रथम क्रमांक प्राप्त झाला. श्री दामोदर वाणिज्य महाविद्यालयाच्या ‘एनसीसी’ गटाला दुसरे तर नावेलीच्या रोझरी कॉलेजच्या आर्मी बॉईजना तिसरे बक्षिस प्राप्‍त झाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल पै यांनी केले.

पर्रीकरांच्‍या स्‍वप्‍नपूर्तीकडे सरकारची वाटचाल

गोवा मुक्तीचे 60 वे वर्ष साजरे करण्यासाठी केंद्र सरकारने 300 कोटी रुपये दिले, त्याचा योग्य तो वापर सरकार करीत आहे. गोव्याचे पहिले मुख्यमंत्री स्व. भाऊसाहेब बांदोडकर यांनी अनेक साधनसुविधा कामांचा पाया रचला. मनोहर पर्रीकर यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कारकिर्दीत गोव्याने सर्वांगीण विकासाकडे झेप घेतली, असेही उपमुख्यमंत्री कवळेकर म्हणाले. पर्रीकर याच्या स्वप्नपूर्तीसाठी मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे कसोशीने प्रयत्नशील आहेत. गोव्यात अनेक ठिकाणी विकासकामे सुरू आहेत. त्यामुळे काही भागात कचरा, दुर्गंधी आहे, वाहतुकीवर परिणाम होत आहे. पण, एकदा ही कामे पूर्ण झाल्‍यानंतर सर्व समस्‍या सुटतील, असेल असेही कवळेकर म्हणाले.

‘मतभेद बाजूला सारून विकासकार्य करू’

स्वातंत्र्य टिकवून ठेवण्यासाठी गोमंतकीयांनी राजकीय, सामाजिक मतभेद बाजूला सारून एकमेकांना सहकार्य करणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले. त्यांनी या प्रसंगी स्वातंत्र्यसैनिकांचा खास उल्लेख करून सांगितले की, त्यांनी दिलेल्या बलिदानामुळेच आम्‍ही मुक्त गोव्यात वावरत आहोत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: "एकटा लढेन, मागे फिरणार नाही",पक्ष तिकीट न मिळाल्यास 'स्वतंत्र' लढणार; डॉ. केतन भाटीकर यांची मोठी घोषणा

Shreyas Iyer: दुखापतीमुळे चिंता वाढली: श्रेयस अय्यरला ICU मध्ये हलवलं; कुटुंबाला सिडनीला नेण्याची तयारी सुरू

Pakistan Afghan Tension: पाकिस्तानात मोठी चकमक! 4 आत्मघाती हल्लेखोरांसह 25 दहशतवादी ठार, पाक-अफगाण सीमेवर पुन्हा तणाव; स्फोटकांचा साठा जप्त

Two US Navy Aircraft Crash : 30 मिनिटांत 2 अपघात! दक्षिण चीन समुद्रात अमेरिकेचे हेलिकॉप्टर आणि फायटर जेट क्रॅश; 5 नौदल अधिकारी जखमी VIDEO

Prithvi Shaw Double Century : 34 चौकार, 5 षटकार... पुन्हा एकदा 'शॉ' टाईम! पृथ्वीच्या बॅटमधून चौकार-षटकारांचा वर्षाव, 140 चेंडूत झळकावलं द्विशतक

SCROLL FOR NEXT