Goa LPG Project Dainik Gomantak
गोवा

Goa LPG Project: मुरगाव बंदरात 5 हजार कोटींचे एलपीजी टर्मिनल; 2,450 रोजगार, 80 टक्के पदे गोमंतकीयांसाठी

ANV Global Goa Agreement: गोव्याला एलपीजी आयात, साठवणूक आणि वितरणाचे महत्त्वाचे केंद्र बनविण्याच्या उद्देशाने मोर्मुगाव बंदरात भव्य एलपीजी टर्मिनल उभारण्यात येणार आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: गोव्याला एलपीजी आयात, साठवणूक आणि वितरणाचे महत्त्वाचे केंद्र बनविण्याच्या उद्देशाने मोर्मुगाव बंदरात भव्य एलपीजी टर्मिनल उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी गोवा सरकारने ऊर्जा व्यापार क्षेत्रातील एएनव्ही ग्लोबल कंपनीसोबत ५ हजार कोटी रुपयांचा सामंजस्य करार केला आहे.

गोव्यात प्रथमच स्वतंत्र सागरी एलपीजी आयात सुविधा उभारली जाणार आहे. प्रकल्पांतर्गत स्वतंत्र सागरी धक्का, भूमिगत पाइपलाइन आणि दोन लाख ५८ हजार घनमीटर क्षमतेची साठवणूक व्यवस्था विकसित केली जाईल. या टर्मिनलची वार्षिक हाताळणी क्षमता ३० लाख टन असेल.

राज्य सरकारच्या थेट नियंत्रणाखाली ७,५०० टन क्षमतेचा आपत्कालीन एलपीजी साठा ठेवण्यात येणार आहे. आंतरराष्ट्रीय किंवा राष्ट्रीय पातळीवर इंधनपुरवठा विस्कळीत झाल्यास या साठ्याचा उपयोग राज्यातील पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी होणार आहे.

या प्रकल्पातून सुमारे २,४५० कायमस्वरूपी रोजगार निर्माण होतील. त्यापैकी ८० टक्के पदे गोमंतकीयांसाठी राखीव असतील. बांधकामाच्या टप्प्यातील रोजगारांमध्येही ७० टक्के संधी स्थानिकांना देण्यात येणार आहेत.

प्रकल्पाची वैशिष्ट्ये

एकूण गुंतवणूक : ५,००० कोटी रुपये

ठिकाण : मुरगाव बंदर

कंपनी : एएनव्ही ग्लोबल

वार्षिक हाताळणी क्षमता : ३० लाख टन

एलपीजी साठवण क्षमता : २.५८ लाख घनमीटर

आपत्कालीन राखीव साठा : ७,५०० टन

कायमस्वरूपी रोजगार : २,४५०

स्थानिकांसाठी कायमस्वरूपी रोजगार : ८० टक्के

बांधकामातील स्थानिक रोजगार : ७० टक्के

वार्षिक तांत्रिक प्रशिक्षण : ५०० युवक.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Land Scam: भूखंड गैरव्यवहारात सावईकरना झटका, सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळला; पत्नीला सशर्त जामीन

"अधिकाऱ्यांना लाभ, मग कर्मचाऱ्यांचा DA का रोखला?", उच्च न्यायालयाचा संतप्त सवाल; मुख्य सचिवाला ठोठावला लाखोंचा दंड

Market Fire Safety: म्हापसा बाजारातील पाचही फायर हायड्रन्ट बंद; अग्निसुरक्षा व्यवस्थेचा गंभीर प्रश्न ऐरणीवर

Goa Weather: नरकासुरांच्या तयारीवर अवकाळी पावसाचे पाणी; पुढील तीन दिवस राज्यात पावसाची शक्यता

Vaibhav Sooryavanshi Vice Captaincy: 'वैभवला उप कॅप्टन्सी देणे घाईचे ठरेल', सचिन तेंडुलकरचा सिलेक्टर्संना मोलाचा सल्ला; इमर्जिंग एशिया कपपूर्वी मोठी चर्चा

SCROLL FOR NEXT