Goa clay idol scheme Dainik Gomantak
गोवा

मातीची मूर्ती बनवा, 200 रुपये मिळवा! गोवा सरकारची अनोखी योजना; वाचा माहिती

Clay Ganesh idol scheme Goa: राज्य सरकारच्या मातीच्या गणेशमूर्तींसाठीच्या अनुदान योजनेमुळे या कारागिरांना एक प्रकारे 'नवसंजीवनी'च मिळाली आहे

Akshata Chhatre

Goa ganesh clay idol scheme: गणेशोत्सव जवळ आला असून, प्लास्टर ऑफ पॅरिस (पीओपी) मूर्तींवर बंदी असल्यामुळे गोव्यातील पारंपरिक मूर्तिकारांना मोठा दिलासा मिळाला आहे. राज्य सरकारच्या मातीच्या गणेशमूर्तींसाठीच्या अनुदान योजनेमुळे या कारागिरांना एक प्रकारे 'नवसंजीवनी'च मिळाली आहे, असे मत गोवा हस्तकला, ग्रामीण आणि लघुउद्योग विकास महामंडळ लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक दामोदर मोराजकर यांनी व्यक्त केले.

मातीच्या मूर्तींना २०० रुपये अनुदान

पीटीआयशी बोलताना मोराजकर यांनी सांगितले की, पारंपरिक कारागिरांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांची कला जपण्यासाठी सरकारने ही योजना आणली आहे. या योजनेंतर्गत, प्रत्येक मातीच्या मूर्तीसाठी २०० रुपये (जास्तीत जास्त २५० मूर्तींसाठी) अनुदान दिले जाते. मोराजकर यांच्या मते, ही योजना पर्यावरण आणि सांस्कृतिक अशा दोन्ही दृष्टीकोनातून महत्त्वाची आहे. पीओपी मूर्तींचे विसर्जन केल्यावर त्या पाण्यात विरघळत नाहीत, ज्यामुळे जलप्रदूषण होते, तर मातीच्या मूर्ती पर्यावरणाला कोणताही धोका न पोहोचवता सहज विरघळतात.

या योजनेंतर्गत गोव्यातील सुमारे ४५० मूर्तिकार महामंडळाकडे नोंदणीकृत आहेत. मोराजकर यांनी सांगितले की, गेल्या दोन वर्षांत महागाईचा विचार करून अनुदानाची रक्कम १०० रुपयांवरून २०० रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे. या योजनेमुळे मूर्तिकारांना मूर्ती बनवण्यासाठी लागणारी माती मळण्याची यंत्रे खरेदी करण्यासही मदत मिळत आहे.

कलेचे जतन आणि महागाईवर नियंत्रण

चिंबल गावातील रमेश हरमलकर, जे गेल्या ५० वर्षांपासून आपल्या भावांसोबत मूर्ती बनवत आहेत, म्हणाले की, "सरकारने वेळेवर दिलेले अनुदान आणि माती मळण्याच्या यंत्रामुळे आमचे काम सोपे झाले आहे. जर सरकारने अनुदान दिले नसते तर वाढलेल्या खर्चाला तोंड देण्यासाठी आम्हाला मूर्तींच्या किमती वाढवाव्या लागल्या असत्या." हरमलकर यांच्या मते, मूर्तींची किंमत त्यांच्या उंचीनुसार १,५०० ते ५०,००० रुपयांपर्यंत असते.

त्यांचे बंधू सुनील हरमलकर, जे एका हंगामात ४००-५०० मूर्ती तयार करतात, म्हणाले की, "आम्ही हे काम तीन महिने आधी सुरू करतो. यंत्रामुळे काम जलद होते." उत्तर गोव्यातील माये गावातील रुपेश शेट आणि त्यांचे कुटुंब जून महिन्यापासूनच कामाला लागतात. "सरकारी अनुदानामुळे आम्हाला कच्चा माल मिळवणे सोपे झाले आहे. आम्ही दिवसरात्र काम करून सुमारे ८०० मूर्ती तयार करतो. सर्वांनी मातीच्याच मूर्तींचा वापर करायला हवा, जेणेकरून विसर्जनानंतर माती मातीतच परत जाईल," असे आवाहन शेट यांनी केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs PAK: भारत 'पाकिस्तान'सोबत क्रिकेट सामना का खेळतंय? BCCI नं स्पष्ट केली भूमिका

India vs Pakistan: भारत–पाक सामन्यावरून देशात गोंधळाचं वातावरण, कुठं आंदोलन तर कुठं टीम इंडियाच्या विजयासाठी पूजा-अर्चना Watch Video

तुमचे फोटो बनवा भन्नाट! विंटेज AI, Nano Banana ट्रेंड फॉलो करायचाय? येथे आहेत सर्व Prompt

Amarashilpi Jakanachari History: आश्चर्यकारक छिद्रातून सूर्यप्रकाश येतो, तो थेट मूर्तीवर पडतो; कैडलचा अमरशिल्पी जकनाचारी

Maratha History: छत्रपती शिवाजी महाराजांच्या उदयामुळे, ‘मराठा’ उपाधीला प्रतिष्ठा प्राप्त झाल्यावर गोव्यात बदल घडला

SCROLL FOR NEXT