Goa Government | Pramod Sawant  Dainik Gomantak
गोवा

Goa Government: रोजगार स्‍टार्टअपला '10' लाखांचे अर्थसाह्य

Goa Government: पुढील 5 वर्षांत किमान 500 पेक्षा यशस्वी स्टार्टअप करण्याबरोबर 5 हजारांहून अधिक रोजगार निर्मितीचे लक्ष्य आहे.

दैनिक गोमन्तक

Goa Government: पुढील 5 वर्षांत किमान 500 पेक्षा यशस्वी स्टार्टअप करण्याबरोबर 5 हजारांहून अधिक रोजगार निर्मितीचे लक्ष्य आहे. या स्टार्टअप योजनेसाठी राज्य सरकारचे माहिती तंत्रज्ञान खाते आता आग्रही बनले आहे. दरवर्षी यशस्वी ठरू शकणाऱ्या 100 स्टार्टअपना प्रत्येकी 10 लाख रुपयांपर्यंतचे अनुदान सहाय्य देणार असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज दिली.

पर्वरी येथे कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी पर्यटन आणि माहिती, तंत्रज्ञान मंत्री रोहन खंवटे उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणाले, वाढती बेरोजगारी कमी करण्याबरोबर नवउद्योजक तयार करून निर्मिती क्षेत्रात भरीव योगदान देण्यासाठी माहिती तंत्रज्ञान खात्याने स्टार्टअप योजना मार्गी लावली आहे. युवकांनी सरकारी नोकरीच्या मागे न लागता नवा स्टार्टअप सुरू करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

मंत्री खंवटे म्हणाले, राज्याला देशातील सर्वात अधिक पसंतीचे स्टार्टअप बनवण्याच्या उद्देश आहे. याशिवाय आशिया खंडातील पहिल्या 25 यशस्वी स्टार्टअप्समध्ये राज्याचा समावेश व्हावा, यासाठी सरकारने स्टार्टअप पॉलिसी 2021 ची घोषणा करत अंमलबजावणी सुरू केली आहे. सर्वोत्तम उद्योजकांना आमंत्रित करण्याबरोबर राज्यात एक मजबूत स्टार्टअप इको-सिस्टम तयार केली जात आहे.

विशेष सल्लागाराची केली नियुक्ती: मंत्री रोहन खंवटे

आतापर्यंत राज्यातल्या 116 स्टार्टअप्सना प्रमाणित केले असून 184 जणांचे अर्ज आले आहेत. तर 144 प्रोत्साहन सहाय्यासाठी अर्ज आले आहेत, अशी माहिती खात्याने दिली. तर नव्या स्टार्टअप्सना मार्गदर्शन, सल्ला देण्याकरिता सल्लागारांची नियुक्ती केल्याची माहिती मंंत्री खंवटे यांनी दिली. यामुळे बुथ कॅम्पस आणि व्यवसायांना तातडीची मंजुरी मिळू शकेल. या आधारे स्टार्टअप एखादी योजना घेऊन खात्याकडे आले तर त्यांना या सल्लागारांचे मिळू शकते.

निकोल ब्रॅण्ड ॲम्बेसेडर!

एकोणीस वर्षीय निकोल फारियाने खास महिलांसाठी ‘हॅपी वुमन’ ॲप तयार केला आहे. हा अभिनव स्टार्टअप सुरू केल्याबद्दल नुकताच मुख्यमंत्र्यांच्या हस्ते तिचा सन्मान करण्यात आला. निकोलच्या स्टार्टअपने अल्पावधीत 600 कोटी रुपयांचा व्यवसाय केल्याने राज्यातील इतर स्टार्टअप आणि प्रामुख्याने महिलांसाठी निकोल आयडॉल बनली आहे. माहिती आणि तंत्रज्ञान खातेही निकोलला स्टार्टअप योजनेचे ब्रॅण्ड ॲम्बेसेडर करण्याच्या तयारीत आहे.

रोहन खंवटे, माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री-

माहिती तंत्रज्ञान खात्याच्या वतीने जाहीर केलेली स्टार्टअप योजना देशात सर्वोत्तम आहे. आता त्यामध्ये पूरक बदलही करण्यात आलेले आहेत. त्यामुळे रोजगार निर्मिती आणि निर्मिती क्षेत्रात ठेवलेले उद्दिष्ट खाते नक्कीच पूर्ण करेल अशी खात्री आहे.

तरुणांना उद्योजक बनण्‍याचे आवाहन, राज्‍यात रोजगार वाढेल

  • सरकारने घोषित केलेल्या स्टार्टअप पॉलिसी 2021 मध्ये नव्याने स्टार्टअपपूरक बदल केले आहेत. स्टार्टअप सुरू केल्यानंतर 45 दिवसांमध्ये स्टार्टअपचालक सरकारने जाहीर केलेल्या विविध योजनांकरिता अर्ज करू शकतात.

  • बीज भांडवलाच्या पोटी खात्याच्या वतीने दरवर्षी 100 स्टार्टअपकरिता प्रत्येकी 10 लाख बीजभांडवल देण्याचा माहिती आणि तंत्रज्ञान खात्याची योजना आहे.

  • स्टार्टअप माहिती तंत्रज्ञान प्रमोशन सेलच्या वतीने मान्यताप्राप्त आणि प्रमाणित स्टार्टअप्सना अर्ज केल्यानंतर 60 दिवसांत हे अनुदान सहाय्य देण्यात येईल, असे खात्याने सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: शेअर मार्केटमधून चांगला परतावा देण्याच्या बहाण्याने लाखो रुपये लाटले!

Anjuna Music Event Protest: हणजूणमध्ये संगीत महोत्सवावरून स्थानिकांमध्येच जुंपली; भर सभेत तरुणाला धक्काबुक्की; Video Viral

Goa Politics: ''महाराष्ट्रात महायुतीला विजय मिळाला म्हणून गोव्यातील विरोधक...''; सरदेसाईंचा घणाघात

Goa Cabinet: ‘वाचाळवीर’ स्कॅनरखाली! चार मंत्र्यांना वगळून नव्यांना संधी द्या; मंत्रिमंडळ फेरबदलाच्या चर्चांना उधाण

IFFI 2024: 'समृद्ध जीवनशैलीच्या नादात देश सोडू नका'; 'अमेरिकन वॉरियर्स'च्या निर्मात्या नेमक्या काय म्हणाल्या पाहा

SCROLL FOR NEXT