Police Complaint | Ramanuj Mukherjee Dainik Gomantak
गोवा

Goa Tourism Row: आकडेवारीचा वाद टोकाला; पोस्ट करणाऱ्या CEO विरोधात सावंत सरकारची पोलिसांकडे तक्रार

Foreign Tourist In Goa: कोरोनानंतर गोव्यात येणाऱ्या विदेशी पर्यटकांची संख्या कमी झाल्याची आकडेवारी शेअर करणाऱ्या रामानुज मुखर्जी या व्यक्तीविरोधात गोवा सरकारने तक्रार दाखल केलीय.

Pramod Yadav

पणजी: गोव्याच्या पर्यटनाबाबत समाज माध्यमावर चुकीची आकडेवारी शेअर करणाऱ्या आंत्रप्रेन्युअर विरोधात पर्यटन विभागाने पोलिस तक्रार दाखल केलीय. ‘एक्स’ या समाज माध्यमावर शेअर केलेल्या पोस्टवर अनेकांनी गोव्यातील वाईट अनुभव शेअर केलेत. याचा राज्यातील पर्यटन आणि येथील व्यवसायावर वाईट परिणाम झाल्याचा दावा पर्यटन विभागाने तक्रारीत केला आहे.

पर्यटन विभागाचे उप-संचालक राजेश काळे यांनी सायबर क्राईम विभागाच्या पोलिस अधिक्षकांकडे याबाबत तक्रार दाखल केलीय. आंत्रप्रेन्युअर रामानुज मुखर्जी याने ०५ नोव्हेंबर रोजी एक्सवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये गोव्याच्या पर्यटनाबाबत चुकीची माहिती दिली.

यामुळे राज्यातील स्थानिक व्यवसायावर वाईट परिणाम होण्यासह नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

गोव्यात परदेशी पर्यटक येण्याचे प्रमाण कमी झाले आहे. कोरोनापूर्व आणि कोरोनानंतरची आकडेवारी पाहता राज्यात विदेशी पर्यटकांचा ओघ कमी झाल्याचा दावा मुखर्जी यांनी त्यांच्या पोस्टमधून केला आहे.

काळे यांनी दाखल केलेल्या तक्रारीत काय म्हटलंय?

“गोवा देशी आणि विदेशी पर्यटकांसाठी एक प्रमुख पर्यटनस्थळ म्हणून ओळखले जाते. अशा खोट्या प्रचारामुळे राज्याच्या प्रतिष्ठेला धोका निर्माण होतो तसेच, सार्वजनिक शांततेलाही गंभीर धोका निर्माण होतो. गोव्याची प्रतिमा खराब करण्याच्या छुप्या अजेंड्याचा हा भाग आहे.”

रामानुज यांनी शेअर केलेला डेटा चीन आर्थिक माहिती केंद्राकडून (CEIC) प्रसिद्ध केलेला आहे. ही आकडेवारी कितपत खरी आहे तसेच, त्याच्या सत्यतेबाबत शंका आहे. आकडेवारी शेअर करताना त्याची पर्यटनविभागाकडून खातरजमा न केल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.

कायदेशीर पद्धतीने लढा देणार – रामानुज

रामानुज मुखर्जी यांनी पर्यटन विभागाच्या तक्रारीविरोधात कायदेशीर लढा देणार असल्याचे म्हटले आहे. गोव्याबाबत येणाऱ्या नकारात्मक प्रतिक्रिया विचारात घेऊन सुधारणा करण्याऐवजी सरकार टीका करणाऱ्याविरोधात पोलिस तक्रार दाखल करत असल्याचे रामानुज मुखर्जी म्हणाले.

दरम्यान, गोवा सायबर विभागाचे पोलिस अधीक्षक राहुल गुप्ता यांनी, ‘पर्यटन विभागाकडून अद्याप अधिकृतपणे तक्रार मिळालेली नाही, तक्रार प्राप्त झाल्यानंतर योग्य कारवाई केली जाईल’, अशी माहिती दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: दोन सह्या करुन विवाह उरकला, काही दिवसातच नवदेवाने विचार बदलला; लैंगिक अत्याचारप्रकरणी फोंड्यातील तरुणाला अटक

IFFI 2024 मध्ये लोकसंस्कृतीद्वारे देशाची एकता, अखंडतेचे दर्शन! दवर्लीत होणार खुले फिल्म स्क्रिनिंग

Nithya Menen At IFFI: 'तरीही त्या व्यक्तीसोबत काम करणे कर्तव्यच'; अभिनेत्री नित्या मेनन सहकलाकारांबद्दल नेमके काय म्हणाली..

IFFI 2024: ‘ट्रेन’ संकल्पनेतून भारतीय सिनेमाची ‘सफर’! कॅमेऱ्याच्या प्रवेशद्वाराचे विशेष आकर्षण

Manoj Bajpayee At IFFI: 'वेळेत पूर्णविराम आणि संवादात मौन हवे'; मनोज वाजपेयीने सांगितले अभिनेत्यांबाबतीत दोन टप्पे

SCROLL FOR NEXT