Goa Pink Taxi Service Dainik Gomantak
गोवा

Goa Pink Taxi: पिंक रिक्षानंतर आता महिलांसाठी 'पिंक टॅक्‍सी'; सहकार खाते प्रयत्‍नशील, बँकांशी सकारात्मक चर्चा

Goa Pink Taxi Service: पिंक रिक्षाच्‍या माध्‍यमातून राज्‍यभरातील अनेक महिला आर्थिकदृष्‍ट्या सक्षम होत असतानाच, आता सरकारने महिलांसाठी पिंक टॅक्‍सी आणण्‍याचा विचार चालविला आहे.

दैनिक गोमन्तक डिजिटल

पणजी: पिंक रिक्षाच्‍या माध्‍यमातून राज्‍यभरातील अनेक महिला आर्थिकदृष्‍ट्या सक्षम होत असतानाच, आता सरकारने महिलांसाठी पिंक टॅक्‍सी आणण्‍याचा विचार चालविला आहे. सहकारी तत्त्‍वावर राज्‍यात पिंक टॅक्‍सी सुरू करण्‍यासंदर्भात सहकार खात्‍याने महिला को-ऑपरेटिव्‍ह बँकेशी चर्चा केली असून, बँकेच्‍या अध्‍यक्ष प्रतिमा धोंड यांनीही त्‍यासाठी सकारात्‍मकता दर्शविल्‍याने अशी सेवा राज्‍यात लवकरच सुरू होण्‍याची शक्‍यता आहे.

याबाबत ‘गोमन्‍तक’शी संवाद साधताना सहकार निबंधक आशुतोष आपटे म्‍हणाले, की ‘‘गोवा पर्यटन राज्‍य असल्‍याने दरवर्षी राज्‍याला लाखो देशी-विदेशी पर्यटक भेट देतात. या पर्यटकांना पर्यटनासाठी टॅक्‍सींची मोठ्या प्रमाणात गरज भासते. त्‍यामुळे सहकार मंत्रालयाच्‍या योजनेचा लाभ घेऊन सहकारी तत्त्‍वावरील टॅक्‍सी सेवा सुरू करण्‍याचे प्रयत्‍न आमच्‍याकडून सुरू आहेत. त्‍याचाच एक भाग म्‍हणून पिंक रिक्षानंतर केवळ महिलांसाठी पिंक टॅक्‍सी सेवा सुरू करण्‍याचाही विचार सहकार खात्‍याने चालविला आहे. त्‍यासंदर्भात काहीच दिवसांपूर्वी महिला को-ऑपरेटिव्‍ह बँकेच्‍या संचालक प्रतिमा धोंड यांच्‍याशीही माझी चर्चा झाली असून, त्‍यांनीही अशा सेवेसाठी सकारात्‍मक प्रतिसाद दिला आहे.’’

को-ऑपरेटिव्‍ह सोसायट्यांवर भर

राज्‍यात सध्‍या केवळ एकच महिला को-ऑपरेटिव्‍ह सोसायटी कार्यरत आहे. अशा पद्धतीच्‍या अधिकाधिक सोसायट्या सुरू करण्‍याचे प्रयत्‍नही सहकार खात्‍याकडून सुरू आहेत. त्‍याबाबत विविध क्षेत्रांतील महिलांशी चर्चाही करण्‍यात येत असून, त्‍यांच्‍याकडून पाठिंबाही मिळत आहे. त्‍यामुळे पुढील काळात महिलांसाठी अशा अनेक सोसायट्या राज्‍यभर स्‍थापन होतील, असेही आशुतोष आपटे यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT