Panic button in Goa public vehicles Dainik Gomantak
गोवा

गोव्यातील सार्वजनिक सेवेतील वाहनांना GPS ट्रॅकिंग आणि पॅनिक बटन बसविण्याची सूचना, 30 नोव्हेंबरपर्यंत मुदत

Panic Button in Goa Public Vehicles : गोवा वाहतूक संचालनालयाने २९ ऑक्टोबर रोजी याबाबत सूचना जारी केली आहे.

Pramod Yadav

पणजी: गोवा सरकारच्या वाहतूक संचालनालयाने सार्वजनिक सेवेतील वाहनांसाठी महत्वाची सूचना जारी केली आहे. सार्वजनिक सेवेतील वाहनांना जीपीएस ट्रॅकिंग सिस्टिम आणि पॅनिक (आपत्कालीन) बटन बसवणे बंधनकारक असून, यासाठी ३० नोव्हेंबर २०२५ पर्यंत मुदत देण्यात आली आहे.

गोवा वाहतूक संचालनालयाने २९ ऑक्टोबर रोजी याबाबत सूचना जारी केली आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने ०१ एप्रिल २०१८ पासून मोटार वाहन कायदा १९८८ च्या कलम २ क्लॉझ (३५) अंतर्गत सार्वजनिक सेवेतील वाहन म्हणून जाहीर केलेल्या वाहनांना जीपीएस ट्रॅकिंग सिस्टिम आणि पॅनिक (आपत्कालीन) बटन (एक किंवा त्यापेक्षा अधिक) बसवणे बंधनकारक करण्यात आले आहे.

Transport dept issues public notice

दरम्यान, वाहतूक विभागाकडून वारंवार करण्यात आलेल्या तपासणीत या वाहनांना सिस्टिम आणि पॅनिक (आपत्कालीन) बटन एकतर बसविण्यात आलेले नाही किंवा ते बंद स्थितीत असल्याचे आढळून आले.

त्यामुळे वाहनधारकांना येत्या ३० नोव्हेंबरपर्यंत जीपीएस ट्रॅकिंग सिस्टिम आणि पॅनिक (आपत्कालीन) बटन बसवून घ्यावे अथवा बंद स्थितीत असणारी सुविधा कार्यान्वित करुन घ्यावी, अशी सूचना वाहतूक संचालनालयाचे संचालक प्राविमल अभिषेक यांनी दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

अंधाऱ्या रात्रीत डिव्हायडरजवळ पडला, दारूच्या नशेत उठणंही होतं मुश्किल; 'बिट्स पिलानी'च्या विद्यार्थ्याचा राडा

Vellim Church Attack: 13 वर्षांनंतर ऐतिहासिक निकाल! वेळ्ळी चर्च हल्ला प्रकरणातील सर्व 22 संशयितांची निर्दोष मुक्तता; मडगाव कोर्टाचा मोठा निर्णय

Rohit Arya Shot Dead : मुंबईतील RA स्टुडिओमध्ये 17 मुलांना ओलीस ठेवणारा रोहित आर्य एन्काऊंटरमध्ये ठार

IND vs AUS Semifinal: हरमनप्रीत कौरची चूक क्रांती गौडने सावरुन घेतली! एलिसा हिलीचा कॅप्टनने सोडलेला झेल, पण गोलंदाजाने केली कमाल VIDEO

दोना पावला दरोडा प्रकरणात 7 महिन्यानंतर अटक, उत्तर प्रदेशचा सराईत गुन्हेगार ताब्यात; कोर्टाने सुनावली पाच दिवसांची पोलिस कोठडी

SCROLL FOR NEXT