Loan Dainik Gomantak
गोवा

Goa NABARD Loan: ‘नाबार्ड’कडून गोव्याने घेतले 1368 कोटींचे कर्ज! लोकसभेत झाला खुलासा; सीतारामन यांनी केली आकडेवारी सादर

NABARD loan to Goa: २०२२–२३ ते २०२४–२५ या तीन वर्षांच्‍या कालावधीत गोव्‍यातील पायाभूत साधनसुविधांच्‍या विकासासाठी ‘नाबार्ड’कडून १,७३४ कोटींचे कर्ज मंजूर झालेले होते.

Sameer Panditrao

पणजी: गेल्‍या तीन वर्षांत राज्‍य सरकारने राष्‍ट्रीय कृषी आणि ग्रामविकास बँकेकडून पायाभूत साधनसुविधांच्‍या उभारणीसाठी (नाबार्ड) १,३६८ कोटींचे कर्ज घेतल्‍याची माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेतील लेखी प्रश्‍नाच्‍या उत्तरातून सादर केलेल्‍या आकडेवारीतून समोर आले आहे.

२०२२–२३ ते २०२४–२५ या तीन वर्षांच्‍या कालावधीत गोव्‍यातील पायाभूत साधनसुविधांच्‍या विकासासाठी ‘नाबार्ड’कडून १,७३४ कोटींचे कर्ज मंजूर झालेले होते. पण, सरकारला १,७३५ कोटींचे कर्ज मंजूर झाले. त्‍यातील १,३६८ कोटी आतापर्यंत राज्‍य सरकारला मिळालेले आहे, असे मंत्री सीतारामण यांनी सादर केलेल्‍या आकडेवारीतून दिसून येते.

गोव्‍यास इतर सर्वच राज्‍यांना ‘नाबार्ड’ पायाभूत साधनसुविधांच्‍या विकासासाठी कर्ज पुरवत असते. २०२२–२३ ते २०२४–२५ या कालावधीत ३० राज्‍यांसाठी ‘नाबार्ड’ने १,४०,१५३ कोटी रुपये मंजूर केले होते. त्‍यापैकी १,२२,५९५ कोटींचे आतापर्यंत वितरण करण्‍यात आल्‍याचेही मंत्री सीतारामण यांनी नमूद केले आहे.

दरम्‍यान, गेल्‍या अनेक वर्षांपासून राज्‍य सरकार राज्‍यातील विविध प्रकारच्‍या विकासकामांसाठी ‘नाबार्ड’कडून कर्ज घेत आहे. त्‍यातून आतापर्यंत अनेक प्रकल्‍पही उभारण्‍यात आले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cristiano Ronaldo Engaged: 5 मुलांचा बाप ख्रिस्तियानो रोनाल्डो अडकणार लग्नबंधनात, 10 वर्षांनी जॉर्जिनाशी केला साखरपुडा

Goa Politics: "मुख्यमंत्री एकटेच काम करणार का?" लोबोंचा मंत्रिमंडळाला परखड सवाल

Goa Congress Protest: अमित पाटकरांसह अनेक नेत्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, आझाद मैदानाजवळ काँग्रेसचा निषेध मोर्चा अडवला Watch Video

Goa Live News: शाळा, भजनी मंडळे व स्वयं-साहाय्य गटांना भजन साहित्याचे वाटप

Goa Congress Protest: 28 मतदार एकाच खोलीत? निवडणूक अधिकाऱ्यांची अचानक नेमणूक; काँग्रेसचा मोठा आरोप

SCROLL FOR NEXT