Fish Curry Rice 
गोवा

Fish Curry Rice: गोव्यातील बीच शॅक्समध्ये 'फिश करी-राईस' देणे बंधनकारक - रोहन खंवटे

नुकतेच गोवा स्टेट शॅक पॉलिसी पुढील तीन वर्षांसाठी मंजूर करण्यात आली आहे.

Pramod Yadav

Fish Curry Rice On Beach Shacks: गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यांवरील शॅक्समध्ये भारतीय आणि आंतरराष्ट्रीय पदार्थांसह आता 'फिश करी-राईस' देणे बंधनकारक करण्यात आले आहे. पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी रविवारी झालेल्या पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली.

नुकतेच गोवा स्टेट शॅक पॉलिसी (Goa State Shack Policy 2023-2026) पुढील तीन वर्षांसाठी मंजूर करण्यात आली आहे. सरकारने शॅकच्या नियमांमध्ये काही महत्वाचे आणि मोठे बदल केले आहेत.

शॅक्समध्ये नारळापासून बनवलेल्या 'फिश करी-राईस' देणे नवीन शॅक धोरणाचा एक भाग आहे. गोव्यातील पाककृतीला प्रोत्साहन देणे हा त्याचा एक मुख्य उद्देश आहे, असे मंत्री खंवटे म्हणाले.

शॅकवरती गोव्याचे खाद्यपदार्थ मिळत नसल्याचे पर्यटकांनी तक्रार केली होती. त्यानंतर नवीन धोरणात शॅकवर गोव्याचे पदार्थ देणे बंधनकारक केले आहे.

व्या धोरणात 'डिजिटल कोस्ट' बाबत प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. समुद्रकिनाऱ्यावरील सर्व शॅक्सना पॉईंट ऑफ सेल (POS) मशिन दिले जातील. यामुळे पर्यटकांना डिजिटल व्यवहाराची सुलभता होणार आहे.

राज्यातील पर्यटन हंगाम 1 सप्टेंबर ते 31 मे पर्यंत निश्चित करण्यात आला आहे. त्यानंतर 10 जूनपर्यंत शॅक हटवाव्या लागणार आहेत. नव्या धोरणानुसार, उत्तर गोव्यातील समुद्रकिनाऱ्यांवर 259 शॅक्स बसवण्याची परवानगी देण्यात आलीय, तर दक्षिण गोव्यात 105 शॅक्स बसवता येतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India vs Pakistan: पाकड्यांचा पराभव अटळ! हेड-टू-हेड आकडेवारीत टीम इंडियाचा वरचष्मा, सूर्याची 'ब्लू आर्मी' करणार कमाल

Sanquelim Market Robbery: फसवणुकीचा नवा फंडा! देवासमोर ठेवण्यासाठी मागितले दागिने, भामट्याने केली लंपास सोन्याची पाटली आणि साखळी

Sonam Wangchuck Arrested: लेह हिंसाचारानंतर सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना 'NSA' अंतर्गत अटक

Suryakumar Yadav Controversy: पाकची तक्रार फोल! 'सूर्या' फायनल खेळणार, उलट पाकिस्तानच आला अडचणीत; 'त्या' 2 खेळाडूंवर कारवाईची टांगती तलवार

'तू मूर्ख, देवाने तुला अक्कल कमी दिली; पक्षाच्या कार्यकर्त्यांवर बोलशील तर...',शेर्लेकरांना भाजप नेत्याने दिलेल्या धमकीचा फोन कॉल समोर Audio

SCROLL FOR NEXT