Goa Politics | CM Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: गोवा मंत्रिमंडळात फेरबदलाच्या हालचाली, आणखी एका मंत्र्याला करावा लागणार मंत्रीपदाचा त्याग

मुख्यमंत्र्यांना निकट असलेल्या आणखीन एका मंत्र्याला पक्षासाठी त्याग करण्यास तयार राहा, असा संदेश आठवडाभरात मिळू शकतो.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Politics

लोकसभा निवडणुकीत दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघात विजय मिळवण्यासाठी राज्य मंत्रिमंडळात आणखीन फेरबदल करावे लागतील, असा विचार भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी चालवला असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे.

यामुळे मुख्यमंत्र्यांना निकट असलेल्या आणखीन एका मंत्र्याला पक्षासाठी त्याग करण्यास तयार राहा, असा संदेश आठवडाभरात मिळू शकतो.

या घडामोडींची सुतराम कल्पना सध्या स्थानिक पातळीवर देण्यात आलेली नाही. मडगावचे आमदार दिगंबर कामत यांच्या दिल्ली दौऱ्यानंतर या हालचालींना गती आली आहे. यासाठीच मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना दिल्लीत बोलावून घेण्यात आले होते.

त्यांच्यासमोर या संभाव्य बदलाच्या आराखड्याबाबत कल्पना देण्यात आल्याचे सांगण्यात येते. ही माहिती बाहेर फुटू नये यासाठी लोकसभा निवडणुकीच्या तयारीसंदर्भातील बैठकीसाठी आपण दिल्लीला गेलो होतो, अशी सारवासारव त्यानंतर केली होती.

मात्र, प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांना न घेता थेट मुख्यमंत्र्यांना निवडणूक विषयक बैठकीसाठी कसे बोलावले जाते, या प्रश्नाचे उत्तर मात्र मिळत नव्हते. याबाबत तानावडे यांना विचारले असता त्यांनी सरळपणे मुख्यमंत्र्यांना निवडणूक विषयक बैठकीसाठी दिल्लीला बोलावले नव्हते, असे सांगून टाकले.

आपण सहभागी न होता निवडणुकीसंदर्भातील कोणतीही बैठक होणार नाही. मुख्यमंत्री सरकारी कामासाठी किंवाअन्य कोणत्याही विषयासंदर्भात चर्चेसाठी दिल्लीला गेले असावेत, असेही तानावडे म्हणाले होते. यामुळे मुख्यमंत्री मंत्रिमंडळातील संभाव्य बदलाबाबत चर्चा करण्यासाठी दिल्लीला गेले असावेत, या शक्यतेला बळकटी मिळाली आहे.

1) दिल्लीतून मिळालेल्या माहितीनुसार, दक्षिण गोव्यातून आलेक्स सिक्वेरा यांचा मंत्रिमंडळात समावेश केला गेला असला तरी तो पुरेसा नाही, असे मत भाजपच्या संघटनात्मक बाबींची जबाबदार असलेल्या वरिष्ठ नेत्यांचे बनले आहे.

2) यासाठी मंत्रिमंडळात फेरबदल करण्याची गरज त्यांच्याकडून व्यक्त करण्यात आली आहे. 3 यासाठी प्राथमिक चर्चेसाठी मुख्यमंत्र्यांना बोलावण्यात आले होते.

3) यापूर्वी तत्कालीन सार्वजनिक बांधकामम मंत्री नीलेश काब्राल यांना राजीनामा देण्याचा आदेश पक्षीय पातळीवरून थेटपणे काब्राल यांना देण्यात आला होता. त्याची कल्पना मुख्यमंत्र्यांना नंतर देण्यात आली होती.

4) मत्रिमंडळ रचना हा मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे. त्यामुळे त्यात पक्षीय पातळीवरून झालेल्या हस्तक्षेपाबाबत मुख्यमंत्र्यांनी योग्य ठिकाणी आपली मते नोंदवली होती. त्याची दखल घेत मुख्यमंत्र्यांना पाचारण करण्यात आले होते.

अशीही किनार

विधानसभेचे सभापती रमेश तवडकर यांनी पक्षाला कल्पना न देता भाजपचेच ज्येष्ठ नेते असलेले प्रकाश वेळीप यांना हक्कभंगाची नोटीस बजावणे, कला व संस्कृतीमंत्री गोविंद गावडे यांच्या खात्यावर जाहीर आरोप करणे, गावडे यांनी आदिवासी कल्याण संचालक दशरथ रेडकर यांच्याशी आक्षेपार्ह भाषेत संभाषण करणे आदी बाबींचा विचार या मंत्रिमंडळ फेररचनेवेळी केला जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे काही जणांना मोठ्या पदाला मुकावे लागेल अशीही चर्चा भाजपच्या वर्तुळात सुरू झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: बिहार बंददरम्यान विद्यार्थ्यांवर थेट 'एके-47' ने गोळीबार! पोलिसांचा अमानुष चेहरा कॅमेऱ्यात कैद; एसआयटी जवान डिस्मिस

America New Visa Policy: ऑनलाईन फ्रॉड अन् सेक्सटॉर्शन करणाऱ्यांना झटका! अमेरिकन नागरिकांना लुटणाऱ्या चिनी गँगवर निशाण्यावर; ट्रम्प सरकारची नवी व्हिसा पॉलिसी जाहीर

Weather Update: राज्यात पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम! IMD कडून 31 जुलैपर्यंत 'यलो अलर्ट'; मुसळधार सरींचा अंदाज

CJP Protest Violence: 'सीजेपी' आंदोलनातील हिंसेमागे पाकिस्तान कनेक्शन! दंगल घडवण्यासाठी भामट्यांनी वापरले 'ब्लूटूथ ॲप्स'; पोलिस तपासात हायटेक नेटवर्क उघड

Who is Samreen Kaur: टीम इंडियाचा मॅचविनर 'समरीन'च्या प्रेमात क्लिन बोल्ड! गर्लफ्रेंडसोबतचा रोमँटिक फोटो शेअर; पाहा कोण आहे ती?

SCROLL FOR NEXT