Court Dainik Gomantak
गोवा

Aldona: माजी मुख्य सचिवांना क्लिन चीट; 'हळदोणे' झोनबदलबाबत सरकारने मांडली भूमिका

Aldona: माजी मुख्य सचिवांनी केलेले बांधकाम अवैध नसून सर्व प्रकारचे परवाने घेऊनच केल्याचे उत्तर सरकारने मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठातील जनहित याचिकेला दिले आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Aldona Land Conversion And Illegal Construction Case

पणजी: हळदोणे गावातील सर्वे क्रमांक ३६/१ मध्ये शेतजमिनीचे वसाहतीमध्ये केलेले रुपांतर नगर नियोजन कायद्यातील दुरुस्तीनुसार करण्यात आलेले आहे. त्यामुळे या जमिनीत माजी मुख्य सचिवांनी केलेले बांधकाम अवैध नसून सर्व प्रकारचे परवाने घेऊनच केल्याचे उत्तर सरकारने मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठातील जनहित याचिकेला दिले आहे.

जनहित याचिकादाराने धीरेंद्र फडते याच्या वकिलांनी त्याला जोड उत्तर देण्यास वेळ घेतल्याने त्यावरील सुनावणी येत्या १६ डिसेंबरला ठेवण्यात आली आहे.

हणदोणेतील जमिनीत ज्या ठिकाणी मुख्य सचिव पुनीत कुमार गोयल यांनी बंगला बांधला आहे, तिचे अवैधरित्या झोनबदल करून शेतजमिनीचे रुपांतर वसाहतमध्ये केले आहे. सर्वे क्र. ३६/१ मधील सर्व जमीन ही ‘ना विकास क्षेत्रा’त (एनडीझेड) व सीआरझेड भागात येते. त्यामुळे येथे झोनबदल करता येत नाही. या जमिनीत २०१६ मध्ये बेकायदा बंगल्याचे काम केले आहे, ती जमीन शेतजमीन असल्याचे नोंदमध्ये नमूद आहे. त्यामुळे हे बांधकाम पाडण्याचे निर्देश देऊन तेथील करण्यात आलेला झोनबदल पूर्वस्थितीत करण्याचे निर्देश द्यावेत, अशी विनंती करण्यात आली आहे.

हळदोणे गावातील सर्वे क्र. ३६/१ मध्ये शेतजमिनीचे वसाहतमध्ये केलेले रुपांतर बेकायदा असल्याचा केलेला दावा मुख्य नगर नियोजक राजेश नाईक यांनी सादर केलेल्या उत्तरादाखल फेटाळला आहे. नगर नियोजन कायद्यात केलेल्या कलम १७(२) च्या दुरुस्तीनुसार २०२३ साली हा झोनबदल केला आहे.

जमीन मालकाने झोनबदलासाठी २३ जानेवारी २०२३ रोजी अर्ज केला. सरकार नियुक्त तज्ज्ञ समितीने अर्जाच्या छाननीनंतर केलेल्या शिफारशीनुसार हा बदल केला आहे. प्रा. आराखड्यात सर्वे क्र. ३६/१ मधील सुमारे १८७५ चौ. मी. जमीन शेतजमीन दाखवली होती. समितीने या सर्व बाजू न्याहाळून झोनबदलास परवानगीची अधिसूचना १४ मार्च रोजी काढली होती.

आरोप खोटे; गोयल यांचे प्रतिज्ञापत्र

याचिकेत माजी मुख्य सचिव पुनीत कुमार गोयल यांनाही प्रतिवादी केल्याने त्यांनीही उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. या झोनबदलाशी त्यांचा काहीही संबंध नाही. निवृत्तीनंतर गोव्यात राहण्याचा मनोदय असल्याने दिल्लीतील फ्लॅट ३ कोटी १० लाखांना विकला होता. बदल्यात गोव्यात जमीन घेऊन बंगला बांधायचे होते. त्यासाठी काही जमीन दलालांशी संपर्क साधला. माझ्या एका मित्राने आंतोनिओ क्रुझ या गोव्यातील व्यक्तीचे नाव सुचविले. त्याने हळदोणेतील सर्वे क्र.३६/१ मधील १८७५ चौ. मी.चे बांधकाम दाखविले. पडताळणीनंतर भूखंड खतविक्री ५ जुलै रोजी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bicholim: डिचोली येथील बगलमार्गावर दरडीचा धोका; कोसळण्याची भीती वाढली, रेलिंगला अडकलेली दरड वर्षभर 'जैसे थे'

Yashasvi Jaiswal Fight: LIVE सामन्यात हायव्होल्टेज ड्रामा! यशस्वी जयस्वाल श्रीलंकन गोलंदाजाच्या अंगावर गेला; डोकं आपटलं, धक्का दिला अन्... Watch Video

Sarmanas Pilgaon Road: सारमानस रस्त्यावरील धूळ-चिखलाच्या समस्येवरून प्रेमेंद्र शेट आक्रमक, खनिज वाहतूक रोखली

आरोप निश्चितीपूर्वी आरोपीची बाजू ऐकून घेणे बंधनकारक; उच्च न्‍यायालयाकडून सत्र न्यायालयाचा आदेश रद्द

Illegal Massage Parlours: मसाज पार्लरविरोधात लोबोंचे पत्र; कळंगुटमध्ये बेकायदा आस्थापने सुरू असल्याचे नमूद

SCROLL FOR NEXT