Goa Government Job Dainik Gomantak
गोवा

Goa Government Job: सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! GSSC कडून 436 जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध, कसा कराल अर्ज? जाणून घ्या

Government Job: गोवा कर्मचारी निवड आयोगाकडून (GSSC) विविध सरकारी विभागांमध्ये तब्बल ४३६ पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे.

Sameer Amunekar

पणजी: गोव्यात सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी दिलासादायक बातमी आहे. गोवा कर्मचारी निवड आयोगाकडून (GSSC) विविध सरकारी विभागांमध्ये तब्बल ४३६ पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे.

या भरती प्रक्रियेमध्ये लेखा विभाग, कर विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD), वीज विभाग, कृषी विभाग आणि इतर विविध खात्यांतील रिक्त पदांचा समावेश आहे. त्यामुळे विविध शैक्षणिक पात्रतेनुसार पात्र उमेदवारांना या भरतीतून सरकारी सेवेत दाखल होण्याची मोठी संधी मिळणार आहे.

भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज ८ ऑगस्ट २०२५ पर्यंत सादर करणे आवश्यक आहे. अर्ज करण्यासाठी गोवा कर्मचारी निवड आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर https://gssc.goa.gov.in ऑनलाईन अर्ज दाखल करावा लागणार आहे.

भरतीबाबत महत्वाची माहिती

  • एकूण पदांची संख्या : ४३६

  • खात्यांमध्ये भरती : लेखा, कर, पीडब्ल्यूडी, वीज, कृषी व अन्य

  • अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख : ८ ऑगस्ट २०२५

  • अर्जाची प्रक्रिया : ऑनलाईन — https://gssc.goa.gov.in

सरकारी नोकरीसाठी तयारी करत असलेल्या उमेदवारांनी ही संधी नक्कीच दवडू नये. आयोगाकडून लवकरच पात्रता निकष, शैक्षणिक पात्रता व इतर तपशील वेबसाइटवर जाहीर करण्यात आलीय.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT