GPSC Recruitment Dainik Gomantak
गोवा

Goa Government Job 2024: तरुणांनो सरकारी नोकरीची संधी! गोव्यात एवढ्या पदांसाठी भरती, असा करा अर्ज

GPSC Job Openings Information: गोवा लोकसेवा आयोगाची एकूण 16 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु

Akshata Chhatre

Goa Government Job How To Apply Step By Step Process

पणजी: गोवा लोकसेवा आयोगाने (जीपीएससी) भरती सुरु केली असून तुमच्यासाठी आवश्यक सर्व माहिती आम्ही देणार आहोत. यामध्ये विविध खात्यांमधील एकूण 16 पदांसाठी भरती प्रक्रिया समाविष्ट आहे.

गोवा सरकारमधील कोणत्या विभागांमध्ये भरती?

  • १. संग्रहालय संचालनालय

  • २. पशुसंवर्धन आणि पशुवैद्यकीय सेवा संचालनालय

  • ३. सार्वजनिक आरोग्य विभाग

  • ४. विज्ञान आणि तंत्रज्ञान आणि कचरा व्यवस्थापन विभाग

  • ५. कामगार विभाग

  • ६. कारखाने आणि बॉयलरचे निरीक्षणालय

वरील सर्व विभागांसाठी भरती प्रक्रिया सुरु असून यासाठी लागू होणारे सर्व नियम व अटी जाणून घेऊया.

1. विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग आणि कचरा व्यवस्थापन (DEPARTMENT OF SCIENCE AND TECHNOLOGY AND WASTE MANAGEMENT)

वरील विभागात उपसंचालक (तांत्रिक) या पदासाठी एक जागा उपलब्ध असून, हि जागा अनारक्षित आहे.

या पदासाठी वेतन श्रेणी- 11 अशी असेल.

पात्रता:

  • सध्याचे सरकारी अधिकारी (केंद्र/राज्य/केंद्र शासित प्रदेश)

  • सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, कॉर्पोरेशन, स्वायत्त संस्था किंवा वैधानिक संस्थांचे अधिकारी

  • मान्यताप्राप्त संस्थांचे अधिकारी

2. संग्रहालय संचालनालय (DIRECTORATE OF MUSEUM)

वरील विभागात क्युरेटर या पदासाठी एक जागा उपलब्ध असून हि जागा अनारक्षित आहे.

या पदासाठी वेतन श्रेणी- 7 अशी असेल.

पात्रता:

  • समान पद असलेले केंद्र/राज्य/केंद्रशासित प्रदेशातील सरकारी अधिकारी.

3. पशुसंवर्धन आणि पशुवैद्यकीय सेवा संचालनालय (DIRECTORATE OF ANIMAL HUSBANDRY AND VETERINARY SERVICES)

वरील विभागात पशुवैद्यकीय अधिकारी या पदासाठी भरती सुरु आहे. यामध्ये एकूण 10 जागा उपलब्ध असून पैकी,

अनुसूचित जाती (SC) साठी 1पद

अनुसूचित जमाती (ST) साठी 6 पदे

इतर मागासवर्गीयांसाठी (OBC) 3 पदे उपलब्ध आहेत.

वेतनश्रेणी: 9,300-34,800 + 4,600७ (सुधारित) अशी असेल.

वयोमर्यादा: 45 वर्षांपेक्षा अधिक नाही

पात्रता

  • मान्यताप्राप्त पशुवैद्यकीय पात्रता (भारतीय पशुवैद्यकीय परिषद कायदा, 1984)

  • गोवा राज्य पशुवैद्यकीय परिषदेकडे नोंदणी

  • कोकणी भाषेचे ज्ञान

4. सार्वजनिक आरोग्य विभाग (PUBLIC HEALTH DEPARTMENT)

अ) गोवा मेडिकल कॉलेज

1. सहाय्यक प्राध्यापक (ऑप्टोमेट्री)

या पदासाठी एक जागा उपलब्ध आहे.

वेतनश्रेणी: 11 (सुधारित)

वेतनमान: 15,600-39,100 + ग्रेड पे 6,600 (पूर्व-सुधारित)

वयोमर्यादा: 45 वर्षे किंवा त्यापेक्षा कमी

पात्रता:

1. ऑप्टोमेट्रीमध्ये पदव्युत्तर (मान्यताप्राप्त विद्यापीठ)

2. ऑप्टोमेट्रीमध्ये 3+ वर्षांचा अध्यापनाचा अनुभव

3. कोंकणीचे ज्ञान

4. मराठीचे ज्ञान असल्यास उत्तम

2. सहयोगी प्राध्यापक (ऑप्टोमेट्री)

या पदासाठी एक जागा उपलब्ध आहे.

वेतनमान: 15,600-39,100 + ग्रेड पे 6,600 (पूर्व-सुधारित)

वेतनश्रेणी: 11

वयोमर्यादा: 45 वर्षे किंवा त्यापेक्षा कमी

पात्रता:

1. ऑप्टोमेट्रीमध्ये मास्टर्स/एम.फिल (मान्यताप्राप्त विद्यापीठ)

2. ऑप्टोमेट्रीमध्ये सहाय्यक प्राध्यापक म्हणून 5+ वर्षांचा अध्यापनाचा अनुभव

3. कोंकणीचे ज्ञान

1. पीएच.डी. ऑप्टोमेट्रीमध्ये (यूजीसी-मान्यताप्राप्त विद्यापीठ)

2. प्रकाशन

3. मराठीचे ज्ञान असल्यास उत्तम

3. असोसिएट प्रोफेसर (मेडिकल इमेजिंग टेक्नॉलॉजी)

या विभागात एक जागा (अनारक्षित) उपलब्ध आहे.

वेतनमान: रु. 15,600-39,100+ ग्रेड पे 6,600 (पूर्व-सुधारित)

वेतनश्रेणी: 11 (सुधारित)

वयोमर्यादा: 45 वर्षे किंवा त्यापेक्षा कमी

पात्रता:

1. पीएच.डी. वैद्यकीय इमेजिंग तंत्रज्ञानामध्ये (यूजीसी-मान्यताप्राप्त विद्यापीठ)

2. प्रकाशन

3. मराठीचे ज्ञान असल्यास उत्तम

ब) कनिष्ठ रेडिओलॉजिस्ट

या पदासाठी एक जागा उपलब्ध आहे. (ओबीसीसाठी राखीव)

वेतनमान: 15,600-39,100 + ग्रेड पे 5,400 (पूर्व-सुधारित)

वेतनश्रेणी: स्तर 10 (सुधारित)

वयोमर्यादा: 45 वर्षे किंवा त्यापेक्षा कमी

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 22 नोव्हेंबर 2024

5. कामगार विभाग (DIRECTORATE OF HEALTH SERVICES)

वरिष्ठ ऑर्थोपेडिक सर्जन या पदासाठी एक जागा उपलब्ध आहे.

वेतनमान: 15,600-39,100 + ग्रेड पे 6,600 (पूर्व-सुधारित)

वेतन श्रेणी: 11 (सुधारित)

वयोमर्यादा: 45 वर्षे किंवा त्यापेक्षा कमी

पात्रता

  • मान्यताप्राप्त वैद्यकीय पात्रता (भारतीय वैद्यकीय परिषद कायदा, 1956) ¹

  • ऑर्थोपेडिक सर्जरीमध्ये पदव्युत्तर

  • तीन वर्षांचा कामाचा अनुभव

  • कोकणीचे ज्ञान

  • मराठीचे ज्ञान असल्यास उत्तम

6. कारखाने आणि बॉयलरचे निरीक्षणालय (INSPECTORATE OF FACTORIES AND BOILERS)

कार्यक्रम अधिकारी या जागेसाठी एक जागा उपलब्ध आहे.

वेतन श्रेणी: 7 (सुधारित)

वयोमर्यादा: 45 वर्षे किंवा त्यापेक्षा कमी

पात्रता

  • मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी

  • प्रशिक्षण कार्यक्रमांच्या प्रशासन/व्यवस्थापनात 5 वर्षांचा अनुभव

  • कोंकणीचे ज्ञान

  • मराठीचे ज्ञान असल्यास उत्तम

अर्ज कसा भराल? (Goa Government Job Online Application)

  • www.gpsc.goa.gov.in किंवा www.cbes.goa.gov.in या साईटला भेट द्या

  • ऑनलाइन अर्ज भरण्यापूर्वी सर्व सूचना काळजीपूर्वक वाचा.

  • अर्ज नीट भरा.

  • अर्जाचे शुल्क भरा

    -ऑनलाइन पेमेंट करणार असाल तर ई-पावती डाउनलोड करा

    -ऑफलाइन पेमेंट करणार असाल तर ई-चलन तयार करा, गोव्यातील एसबीआय शाखेत रोख पेमेंट करा आणि चलनावर बँकचा स्टॅम्प घयायला विसरू नका.

  • यशस्वी पेमेंट केल्यानंतर अर्ज डाउनलोड करा.

अर्ज भरण्याची अंतिम तारीख: (Last Date Of Application)

  • Posts Other Than Transfer on Deputation : 22 नोव्हेंबर 2024

  • Transfer on Deputation Posts Only : 22 डिसेंबर 2024

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT