Yuri Alemao, Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

Yuri Alemao: कलाकार-खेळाडूंना ग्रेस मार्क्स आणि नोकरीत आरक्षण देण्यात सरकार सपशेल अपयशी

Ganeshprasad Gogate

Yuri Alemao: सरकारी नोकर भरतीसाठी कोकणीचे ज्ञान आवश्यक करण्याच्या मुद्द्यावर विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी सावंत सरकारवर निशाणा साधल्यावर आता त्यांनी गोवा सांस्कृतिक धोरण आणि गोवा क्रीडा धोरणाची अंमलबजावणी या विषयावरून सरकारला पुन्हा एकदा घेरले आहे.

गोवा सांस्कृतिक धोरण 2007 आणि गोवा क्रीडा धोरण 2009 हे काँग्रेस सरकारने कला आणि संस्कृती आणि क्रीडा क्षेत्रातील स्थानिक प्रतिभावंताना प्रोत्साहन देण्यासाठी सुरू केले होते.

या धोरणांमध्ये सांस्कृतिक क्षेत्रातील विद्यार्थी आणि खेळाडूंसाठी ग्रेस मार्क्सची तसेच कलाकार आणि खेळाडूंना नोकरीत आरक्षण देण्याचीही तरतूद आहे. दुर्दैवाने, 2012 पासून सत्तेत आलेले भाजप सरकार दोन्ही धोरणांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात अपयशी ठरले, असा आरोप विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केला आहे.

''37व्या राष्ट्रीय खेळातील पदक विजेत्यांना सरकारी नोकऱ्या देण्याची तुमची पूर्वीची घोषणा आणि मिस इंडिया डेफ इंटरनॅशनल रनर अप विनिता शिरोडकर यांना नुकत्याच दिलेल्या सरकारी नोकरीच्या आश्वासनाचीही मी तुम्हाला आठवण करुन देतो'', अशा शब्दात आलेमाव यांनी ट्वीट केलंय.

2007 आणि 2009 मध्ये काँग्रेस सरकारने या क्षेत्रातील तज्ञांचे मत घेऊन गोवा सांस्कृतिक धोरण आणि गोवा क्रीडा धोरण तयार केले. मात्र सरकारला 2012 पासून विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क्स आणि कलाकार तसेच खेळाडूंना नोकरीत अद्याप आरक्षण देता आलं नाही.

सरकार किमान जानेवारी 2024 पासून तरी कर्मचारी निवड आयोगामार्फत गट C भरती प्रक्रिया सुरू करेल अशी मला आशा आहे अशा शब्दात त्यांनी सावंत सरकारवर निशाणा साधला आहे

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grammy Award विजेता कलाकार गोवा सनबर्नमध्ये करणार सादरीकरण; Skrillex, DJ Peggy Gou यांची नावे जाहीर

Sindhudurg: गोव्यात मौजमजेसाठी येणाऱ्या पोलिसांना कर्तव्याचा विसर, कॉलेज तरुणीची काढली छेड, स्थानिकांनी दिला चोप

Sadanand Shet Tanavade: संसदेच्या वाणिज्य स्थायी समिती सदस्यपदी सदानंद शेट तानावडे यांची निवड

Bashudev Bhandari Missing Case: बाशुदेव भंडारी बेपत्ता प्रकरणी संशयितांची पोलिसांकडून कसून चौकशी; केंद्रीय गृहमंत्रालयाने दखल घेताच तपासाला वेग

Badlapur Encounter: अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी राजकीय दावे विरुद्ध जनतेचा पाठिंबा; ''देवानेच न्याय केला...''

SCROLL FOR NEXT