Goa Human Resource development corporation walk in interview Dainik Gomantak
गोवा

Job Vacancy: गोवा मानव संसाधन विकास महामंडळात नोकरीची संधी; 370 जागांसाठी थेट मुलाखत

गोवा मानव संसाधन विकास महामंडळात मोठ्या नोकर भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

Pramod Yadav

Goa Human Resource development corporation walk in interview: गोवा मानव संसाधन विकास महामंडळात मोठ्या नोकर भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. येथील विविध तीन पदांच्या 370 जागांसाठी थेट मुलाखत घेतली जाणार असून, पॅनेलमेंट आधारावर ही भरती केली जात असल्याचे विभागाने म्हटलंय.

मल्टी टास्किंग कामगार पदासाठी 300 जागा, चालक कम मेसेन्जर पदासाठी 50 आणि स्वीय सहाय्यक / स्टेनो सचिव पदासाठी वीस जागा आहेत.

मल्टी टास्किंग कामगार पदासाठी 300 जागा

मल्टी टास्किंग कामगार पदासाठी 300 जागा आहेत. यासाठी उमेदवार दहावी पास असणे आवश्यक असून, वयोमर्यादा 18 ते 45 दरम्यान आहे. या पदासाठी 14,000 रूपये पगार असेल.

चालक कम मेसेन्जर पदासाठी 50 जागा

चालक कम मेसेन्जर पदासाठी 50 असून, यासाठी देखील शिक्षणाची अट दहावी आहे. तसेच, LMV/HMV चालक परवाना असणे आवश्यक आहे. या पदासाठी 16,000 पगार निश्चित करण्यात आला असून, वयोमर्यादा 18 ते 45 आहे.

स्वीय सहाय्यक / स्टेनो सचिव पदासाठी 20 जागा आहेत.

स्वीय सहाय्यक / स्टेनो सचिव पदासाठी 20 जागा आहेत. यासाठी उमेदवार पदवी धारक असणे अपेक्षित आहे. शिवाय त्याचे शॉर्ट हँड प्रमाणपत्रही सादर करावे लागणार आहे. 18 ते 45 वयोगटातील उमेदवार मुलाखत देऊ शकतात व यासाठी 20 हजार वेतन देण्यात येईल.

पात्रता निकष पूर्ण करणारे उमेदवार थेट मुलाखतीसाठी हजर राहू शकतात. मल्टी टास्किंग कामगार पदासाठी 28 ऑगस्ट रोजी थेट मुलाखत आयोजित करण्यात आली असून, याच वेळी कौशल्य चाचणी देखील घेतली जाणार आहे.

तर, चालक कम मेसेन्जर आणि स्वीय सहाय्यक / स्टेनो सचिव पदासाठी 29 ऑगस्ट रोजी थेट मुलाखत आयोजित करण्यात आल्या आहेत. सकाळी 10.30 पासून मुलाखतीला सुरूवात होईल असे जाहिरातीत म्हटले आहे.

गोवा मानव संसाधन विकास महामंडळाच्या पर्वरीत येथील कार्यालयात मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. उमेदवारांनी बायोडाटासह पासपोर्ट साईट फोटो, कागदपत्राच्या मूळ पत्र, शिक्षण, जन्म दाखला, रहिवासी दाखला, रोजगार कार्ड ही कागदपत्रे जवळ ठेवणे आवश्यक आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

WhatsApp Username Feature: व्हॉट्सॲपच्या 'युझरनेम' फिचरने वापरकर्त्यांचा फायदा की सायबर गुन्हेगारांची चांदी?

Goa Politics: राजकारणात 'नव्या' पक्षांचा जुना खेळ

Goa Congress: अमित पाटकर अखेर काँग्रेस भवनात; आवश्यक दस्तऐवज संबंधित पदाधिकाऱ्याकडे सुपूर्द

Durand Cup Football: आशियातील सर्वात जुनी 135 वी 'ड्युरँड कप स्पर्धा' 25 जुलैपासून; पण सलग दुसऱ्या वर्षीही गोव्याचा एकही संघ मैदानात नाही

Goa Rain Water Harvesting: 47 सरकारी शाळांतच 'रेन वॉटर हार्वेस्टिंग'! राज्यातील 7 टक्के शाळांकडून सरकारी धोरणाला प्रतिसाद

SCROLL FOR NEXT