Goa Governor Book Launch: 'गोव्यातील पुरातन वृक्ष'; राज्यपालांचे खास पुस्तक, राजभवनात झाले प्रकाशन

राज्यपालांनी लिहलेले 'गोव्यातील पुरातन वृक्ष' पुस्तक पर्यटकांसाठी माहितीपर ठरणार आहे.
PS Pillai Book Launch
PS Pillai Book LaunchDIP
Published on
Updated on

Goa Governor PS Pillai Book Launch: गोव्याचे राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी लिहलेल्या एकूण तीन पुस्तकांचे प्रकाशन आज (दि.18) राजभवन येथे आयोजित एका कार्यक्रमात पार पडले.

गोव्यावर आधारित 'गोव्यातील पुरातन वृक्ष' या पुस्तकाचे प्रकाशन हे या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण होते. राजभवनातील दरबार हॉलमध्ये दुपारी बारा वाजता पश्चिम बंगालचे राज्यपाल डॉ. सी. व्ही. आनंद बोस यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन पार पडले.

यावेळी राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांच्या मल्याळम 'एंटे प्रिया कविताकल' या कवितासंग्रहाचे आणि 'व्हेन पॅरलल लाईन्स मीट' या इंग्रजी पुस्तकाचे प्रकाशन देखील यावेळी पार पडले. तसेच, 'हेरिटेज ट्रीज ऑफ गोवा' अशा एकूण तीन पुस्तकांचे प्रकाशन यावेळी पार पडले.

राज्यपालांनी लिहलेले 'गोव्यातील पुरातन वृक्ष' पुस्तक पर्यटकांसाठी माहितीपर ठरेल असे त्यांनी यावेळी प्रकाशन संमारंभात सांगितले.

पुस्तक प्रकाशनाच्या या सोहळ्याला राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, पर्यटन मंत्री रोहन खंवटे, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते दामोदर मावजो, आर्चबिशप फिलिप नेरी कार्डिनल फेर्राव, रामकृष्ण मिशनचे सचिव स्वामी महेशात्मानंद आणि पत्रकार पाचू मेनन उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa High Court Tree Cutting Case
mla viresh borkar
adv rohit bras de sa amicus curiae
goa transport department speed governor notice
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com