LPG Cylinder Rate Updates Dainik Gomantak
गोवा

Goa LPG Advisory: एलपीजी ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; गोवा सरकारकडून अ‍ॅडवायझरी जारी

Civil Supplies Department Goa: गोवा सरकारच्या नागरी पुरवठा विभागाने राज्यातील एलपीजी ग्राहकांसाठी अ‍ॅडवायझरी जारी केली आहे.

Manish Jadhav

पणजी: गोवा सरकारच्या नागरी पुरवठा विभागाने राज्यातील एलपीजी ग्राहकांसाठी अ‍ॅडवायझरी जारी केली आहे. या अ‍ॅडवायझरीमधून ग्राहकांना काही महत्त्वाच्या सूचना करण्यात आल्या आहेत. गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी राज्याचा नागरी पुरवठा विभाग वेळोवेळी पाऊले उचलत असतो. याचच भाग म्हणून राज्यातील एलपीजी ग्राहकांसाठी ही अ‍ॅडवायझरी जारी करण्यात आली आहे.

अ‍ॅडवायझरीमध्ये काय म्हटले?

दरम्यान, नागरी पुरवठा आणि ग्राहक व्यवहार विभागाने एलपीजी ग्राहकांसाठी जारी केलेल्या अ‍ॅडवायझरी म्हटले की, डिलिव्हरीच्या वेळी सिलेंडरचे वजन तपासावे, सिलेंडरला सेफ्टी सील आहे की नाही ते चेक करावे. तसेच, मोबाईल अ‍ॅप किंवा आयव्हीआरएस द्वारे डिलिव्हरीची पडताळणी करण्याचा आणि पावती मागण्यासोबत घरपोच डिलिव्हरीच्या अधिकाराचा वापर करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तसेच, ग्राहकांना काही तक्रारी असतील तर त्यांच्यासाठी 0832-2226084 नंबर देण्यात आला आहे. याशिवाय, ते csi-hq.goa@gov.in/ या ईमेलवर ईमेल करुन तक्रार करु शकतात.

दुसरीकडे, काही दिवसांपूर्वी शांतीनगर-नावेली येथील एका चायनीज फास्ट फूड रेस्टॉरंटमध्ये रात्री एका भरलेल्या एलपीजी (LPG) सिलिंडरचा स्फोट झाल्याने मोठी आग लागली होती. या आगीत लाखोंची हानी झाली होती. राज्यातील अशा घटनांना आळा घालण्यासाठी वेळोवेळी सरकारकडून पाऊले उचलली जातात. शिवाय अशाप्रकारच्या अ‍ॅडवायझरी देखील जारी केल्या जातात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

E-Waste: प्रत्येक नव्या खरेदीमागे जुन्या उपकरणांचा कचरा वाढतो, तोच ढीग गंभीर समस्या म्हणून उभा राहतो; ई-कचऱ्याचा विळखा

Super Cup: सुपर कपचा बिगुल! 25 ऑक्टोबरपासून रंगणार थरार; FC Goa समोर विजेतेपद राखण्याचे खडतर आव्हान

Goa Taxi: 'टॅक्‍सी ॲग्रीगेटर जबरदस्तीने लादणार नाही'! गुदिन्‍होंची हमी; सरकारकडे सुमारे 3500 सूचना, हरकती

Panaji: ‘बोर्डवॉक’ची पणजी महानगरपालिका दुरुस्ती करणार? 2 वर्षांपासून दुर्दशा; धोका असूनही नागरिकांचा वावर

Chandel Hasapur: सरपंचालाच मिळाली सरकारी नोकरी, पदासह दिला पंच सदस्यत्वाचा राजीनामा; चांदेल हसापूरमध्ये रंगणार रस्सीखेच

SCROLL FOR NEXT