Goa Government Schools  Dainik Gomantak
गोवा

Goa Government Schools : सरकारी शाळांच्या स्थितीस सरकारच जबाबदार; बर्डेंचा निशाणा

राज्यातील सरकारी शाळांचा दर्जा घसरण्यास व विद्यमान स्थिती उद्भवण्यास राज्य सरकारचे धोरणच जबाबदार आहे.

दैनिक गोमन्तक

म्हापसा : राज्यातील सरकारी शाळांचा दर्जा घसरण्यास व विद्यमान स्थिती उद्भवण्यास राज्य सरकारचे धोरणच जबाबदार आहे. दुसरीकडे सरकारने या शाळांना स्वातंत्र्यसैनिकांची नावे देण्याचा प्रस्ताव आणला आहे, पण मोजक्याच सैनिकांची नावे या शाळांना लागतील व त्यामुळे इतरांवर हा अन्याय असेल. सरकारने विचारपूर्वक असे प्रस्ताव आणले पाहिजेत, असे मत काँग्रेसचे प्रवक्ते संजय बर्डे यांनी व्यक्त केले.

आमचा या प्रस्तावाला विरोध नाही, परंतु इतर स्वातंत्र्यसैनिकांवर हा अन्याय नाही का? असा सवाल उपस्थित करीत बर्डेंनी या प्रकारामुळे भेदभावाची स्थिती निर्माण होऊ शकते, याकडे लक्ष वेधले. शनिवारी म्हापसा येथील काँग्रेस कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी सितेश मोरे व प्रशांत जाधव उपस्थित होते. सध्या सरकारी शाळांमधील पटसंख्या कमी होत असून याला सरकारचे धोरण जबाबदार आहे, असेही बर्डे म्हणाले.

मुलांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना हवी

सध्या राज्यात कथित अपहरणाची प्रकरणे समोर येताहेत. त्यामुळे सरकारने शाळकरी मुलांना सुरक्षा पुरविण्यासाठी ठोस उपाययोजना केली पाहिजेत. कारण ही मुले देशाचे भवितव्य आहेत. याशिवाय रस्त्यांवर तसेच शाळेच्या आवारातील मोक्याच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची नितांत आवश्यकता असल्याचे बर्डे म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT