Goa 27 आणि 30 ला स्वयंपूर्ण युवा कार्यक्रमाचे आयोजन; मुख्यमंत्र्यांची माहिती Dainik Gomantak
गोवा

युवकांच्या 'रोजगारबाबत' गोवा सरकार गंभीर..

27 आणि 30 ला स्वयंपूर्ण युवा कार्यक्रमाचे आयोजन; मुख्यमंत्र्यांची माहिती

दैनिक गोमन्तक

पणजी: स्थानिक युवकांना रोजगार संधी उपलब्ध करून देण्यासाठी (Goa) राज्य सरकारच्या कामगार खात्याच्या वतीने येत्या 27 ऑक्टोबर रोजी म्हापसा येथे, तर 30 ऑक्टोबर रोजी फोंडा येथे ‘स्वयंपूर्ण युवा’ कार्यक्रमाचे आयोजन केले असून यात देशभरातील 60 हून अधिक कंपन्या सहभागी होत असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत (CM Pramod Sawant) यांनी दिली आहे. यावेळी कामगार मंत्री जेनिफर मोन्सेरात उपस्थित होत्या.

राज्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार युवकांच्या रोजगार संधीबाबत सक्रीय झाले आहे. यासाठीच स्वयंपूर्ण युवा कार्यक्रमाचे आयोजन केले असून या कार्यक्रमांमध्ये राज्य सरकारच्या विविध खात्यांबरोबरच 60 हून अधिक खासगी कंपन्या, बँका सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमांमध्ये रोजगार संधीबरोबरच स्वयंरोजगारासाठीच्या वेगवेगळ्या प्रकारच्या योजना आणि संधी यांची ही माहिती देण्यात येणार आहे. याशिवाय युवक युवतींसाठी करियरसाठीचे मार्गदर्शनही करण्यात येणार आहे.

यापूर्वी साखळी आणि ताळगाव येथे अशा कार्यक्रमांचे आयोजन केले होते. आता या कार्यक्रमाचे स्वरूप वाढवण्यात आले असून अनेक खासगी उद्योग, संस्थांना यासाठी बोलावण्यात आले आहे. या रोजगार मेळाव्यात 1 हजारहून अधिक रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. यासाठी सरकारी पोर्टलवर नाव नोंदणी करा किंवा सकाळी प्रत्यक्ष नोंदणी करू शकता, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.

राज्य सरकारच्यावतीने 10 हजार नोकऱ्यांचे आश्वासन देण्यात आले होते. त्यापैकी आठ हजार नोकऱ्यांची जाहिरात काढण्यात आली आहे. यापैकी एक हजारहून अधिक नोकऱ्यांची सर्व प्रक्रिया 19 डिसेंबर पूर्वी पूर्ण करण्यात येणार आहे.

- डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Drug Case: मोडसाय - बड्डे येथे घरातूनच चालायचा 'ड्रग्स'चा धंदा; गांजासह पोलिसांनी जप्त केली Airgun

GCA Election: रोहन गटाचा 'त्रिफळा'; चेतन-बाळूचा विजयी 'षटकार'; परिवर्तन गटाचा 6-0 फरकानं उडाला धुव्वा, पाटणेकरांचाही पराभव

Operation Sindoor: भारताने अमेरिकेचा मध्यस्थीचा प्रस्ताव धुडकावून लावला... 'ऑपरेशन सिंदूर'वर पाकिस्तानी परराष्ट्रमंत्र्याचा मोठा खुलासा VIDEO

'ओंकार' परतून गोंयात आयलो रे..! फकीर पाटो येथे केळीच्या बागेचे केले नुकसान; कायमचा बंदोबस्त करण्याची मागणी

Goa Tourism: पर्यटन मंत्री खंवटे म्हणतात, 'टॅक्सी व्यावसायिकांना माफिया म्हणू नका'; गोवा आणि 'व्हिएतनाम'मधील पर्यटनाचा फरकही केला स्पष्ट

SCROLL FOR NEXT