Price Hike in Pernem and Bardez Dainik Gomantak
गोवा

Goa land Price Hike: बार्देश, पेडण्यात जागा विकत घेणं महागलं, किमतीत 130 टक्क्यांची वाढ

Land Price Hike in Pernem and Bardez: मंत्रिमंडळाकडून बार्देश आणि पेडणे तालुक्यातील जमिनीच्या किमान किमतीमध्ये १३० टक्क्यांची दरवाढ

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: राज्य मंत्रिमंडळाकडून बार्देश आणि पेडणे तालुक्यातील जमिनीच्या किमान किमतीमध्ये १३० टक्क्यांची दरवाढ केली असल्याने इथे नवीन जागा विकत घेणं महागणार आहे.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिलेल्या माहितीनुसार 500 sqm पर्यंत घर बांधणीसाठी जागा विकत घेणाऱ्यांना जुना दर लागू होईल, तसेच स्थानिकांवर या निर्णयाचा परिणाम होणार नाही.

दरांमध्ये केलेल्या बदलांमुळे 3000 प्रति चौ.मी वरून किंमत थेट 8000 प्रति चौ.मी पर्यंत वाढेल आणि व्यावसायिक कारणांसाठी मालमत्ता खरेदी करणाऱ्या लोकांना ही नवीन किंमत मोजावी लागणार आहे.

गेल्या अनेक काळापासून विविध कलाकार, क्रिकेटपटू आणि राजकारण्यांसाठी बार्देश आणि पेडणे हे दोन तालुके प्रमुख आकर्षण बनले आहेत.

सदर निर्णयामधून सरकारी खजिना वाढायला मदत होईल, राज्यातील इतर तालुक्यांजवळ लक्ष केंद्रित केले जाईल आणि दिवसेंदिवस वाढणाऱ्या मागणीमुळे बार्देश आणि पेडणे इथे सुरु असलेल्या बांधकामावर काहीसा निर्बंध लावायला मदत मिळेल असे मुख्यमंत्री डॉ.सावंत म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

PM Modi Diwali Celebration With Jawan's: ऑपरेशन सिंदूरच्या यशाचा जल्लोष! पंतप्रधान मोदी गोव्यात नौदलाच्या सैनिकांसोबत साजरी करणार यंदाची दिवाळी

IND vs AUS ODI: कांगारुंची दाणादाण उडवायला टीम इंडिया सज्ज, पहिल्या वनडेत कोणत्या 11 शिलेदारांना मिळणार संधी? गिल-रोहित सलामीला, मग जैस्वालचं काय?

Goa News: रामा कानकोणकर हल्ला प्रकरण; झेनिटो कार्डोझोला २ दिवसांची पोलिस कोठडी

Narkasur in Goa: 20 फुट उंच, अक्राळ-विक्राळ डोळ्यांचा महाकाय! जगात सापडणार नाही असा अनुभव; कुठे बघाल 'नरकासुर दहनाचा' थरार?

Afghanistan Pakistan Clash: तालिबानच्या हल्ल्याने पाकिस्तानची नाचक्की! सैनिकांच्या पॅन्ट आणि शस्त्रे जप्त; 48 तासांची युद्धबंदी जाहीर Watch Video

SCROLL FOR NEXT