Traffic Jam On Mumbai Goa Highway
मुंबई: काही तासांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवासाठी मुंबईतून ठिकाणावरुन चाकरमानी कोकणात निघाले आहेत. पण, मुंबई गोवा महामार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाल्याने गणेशभक्त अजून प्रवासातच आहेत.
गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी त्रास गणेशभक्तांना सहन करावा लागत आहे. गेल्या चोवीस तासांपासून काही प्रवासी या कोंडीत अडकून पडल्याचे काही प्रवाशांनी सोशल मिडियावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
गणेशोत्सवासाठी मोठ्या संख्येने गणेश भक्त कोकणात जात असतात. यावेळी देखील बाप्पाच्या आगमनासाठी गणेशभक्त कोकणात जात असून, मुंबई गोवा महामार्गावर ट्रॅफिक जॅम झाले आहे. अनेकांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून महामार्गावरील वाहतूक कोंडीचे फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत.
एक्स सोशल मिडियावर अनेकांनी मुंबई - गोवा महामार्गावरील व्हिडिओ आणि फोटो शेअर केले आहेत. एका युझरने, 'गेल्या अनेक वर्षापासून मुंबई - गोवा महामार्ग अपूर्ण आहे. दरवर्षी गणपतीला कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना मोठा त्रास सहन करावा लागतो', अशी प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर नागोठणे, सुकेळी खिंड, लोणेरे परिसरात ट्रॅफिक जॅम झाली आहे. एका युझरने महामार्गावरील वाहतूक कोंडीचे फोटो शेअर करत संताप व्यक्त केला आहे.
'काल मुंबईवरून 24 तासानंतर लोक गावी पोहचले, कोकणाकडच्या रस्त्यांवर दुर्लक्ष केल्याबद्दल आपले धन्यवाद!', अशी संतप्त प्रतिक्रिया आणखी एका युझरने दिली आहे.
आणखी एका युझरने महामार्गावर अवजड वाहनांना बंदी असताना काही ट्रक आणि अवजड वाहने दिसतायेत, असा सवाल एका युझरने उपस्थित केला.
कोकण रेल्वेचे वेळापत्रक कोलमडलं! (Konkan Railway)
कोकण रेल्वेच्या वतीने गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर 310 जादा गाड्या सोडल्या आहेत. यामुळे कोकण रेल्वेचं वेळापत्रक कोलमडलं असून, काही गणपती स्पेशल गाड्या साडेचार तास विलंबाने तर, नियमित धावणाऱ्या गाड्या दीड तास उशीराने धावत आहेत. यामुळे देखील चाकरमान्यांचा खोळंबा होत आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.