Mhadai Sanctuary Dainik Gomantak
गोवा

Mhadai Sanctuary: ‘व्याघ्र’मुळे ‘म्हादई’ला नवसंजीवनी; मात्र उच्च न्यायालयाच्या 'त्या' आदेशाने कुठे आनंद तर कुठे नाराजी

वन्यप्राण्यांचा अधिवास : पर्यावरणप्रेमींमध्ये आनंद, भूमिपुत्रांमध्ये नाराजी; न्यायालयाचा आदेश

गोमन्तक डिजिटल टीम

Mhadai Sanctuary सत्तरी तालुक्यातील घनदाट म्हादई अभयारण्य जंगली प्राण्यांनी बहरलेले असून अशा वन्यप्राण्यांचे संरक्षण करणे, संवर्धन करण्याचे दायित्व प्रत्येकाचे आहे. आता उच्च न्यायालयाने सरकारला तीन महिन्यांत व्याघ्र क्षेत्र अधिसूचित करावे, असा आदेश दिल्याने भूमिपुत्रांनी नाराजी व्यक्त केली आहे. तर पर्यावरणप्रेमींनी आनंद व्यक्त केला आहे. सत्तरीचा ग्रामीण भाग म्हादई अभयारण्याने चारही दिशेने व्यापलेला आहे.

सत्तरी तालुक्यात पट्टेरी वाघ आहे, याचा प्रत्यक्षदर्शी छायाचित्रांचा पुरावा मिळत नव्हता. पण मागील दहा वर्षांत अनेकवेळा रानात बसवलेल्या कॅमेऱ्यात पट्टेरी वाघांच्या छब्या बंदिस्त झालेल्या आहेत.

साट्रे गावातील म्हादईच्या हिरव्यागार वनराईत कॅमेऱ्यात मादी पट्टेरी वाघ व सोबत दोन बछडे टिपले गेले होते. सत्तरी तालुका म्हादई अभयारण्य हे व्याघ्र क्षेत्र म्हणून नावारूपाला येण्यासाठी न्यायालयीन आधार मिळाला आहे. पण तशी कृतिशील घोषणा अजून घोषित झालेली नाही.

२०१३ साली सर्वात पहिल्यांदा पट्टेरी वाघ कॅमेऱ्यात बंदिस्त झाला होता. त्यातून वाघांचे वास्तव्य समोर आले होते. याची दखल घेत गोवा सरकारने प्राणी शास्त्रज्ञ डॉ. उल्हास कारंथ यांना पाचारण करून याविषयी जबाबदारी दिली होती.

त्यानंतर २०१५ साली पट्टेरी वाघाचे दर्शन कॅमेऱ्यातून झाले होते. २३ मे २०१६ साली काळा वाघ दिसला होता. २०१७ साली साट्रे गावच्या जंगलात तब्बल पाच वाघ नजरेस आले होते. एकूणच सत्तरी तालुक्यात पट्टेरी वाघ असल्याचे सिद्ध झाले आहे.

पट्टेरी वाघाची भ्रमंती सुरूच

२०२०-२१ या काळात गोळावली भागात पट्टेरी वाघाने (मादी) पाळीव प्राण्यांवर हल्ला करून स्वत:चे अस्तित्व दाखवून दिले होते. त्यानंतर चार पट्टेरी वाघांची झालेली हत्या ही घटनाही अधोरेखित करावी लागेल. पट्टेरी वाघ एका ठिकाणी राहणारा प्राणी नाही. त्याची भ्रमंती सुरूच असते.

स्वयंचलित कॅमेऱ्यांत कैद

म्हादई अभयारण्यात सर्वेक्षण याआधी करण्यात आले आहे. तेव्हा चार-पाच ठिकाणी पट्टेरी वाघ असल्याचे पुरावे मिळाले आहेत. वाघांच्या पायांचे ठसे, मलमूत्र डेहराडूनला पाठविले होते. तसेच अस्वल, पाक मांजर, खवले मांजर, चौशिंगा, मेरू, पिसय आदी वन्यप्राणीही दिसले आहेत. सत्तरीत पट्टेरी वाघ, काळा वाघ यांचे छायाचित्र कॅमेऱ्यात कैद झाले होते.

वनाधिकारी वर्गाचे विशेष योगदान...

  • १९९९ साली अधिसूचित केलेले म्हादई अभयारण्य हा वाघांचा पूर्वापार नैसर्गिक अधिवास आहे.

  • २०१३ साली तत्कालीन वन परिक्षेत्र अधिकारी परेश परोब यांनी म्हादईच्या जंगलात वाघ असल्याचे छायाचित्रांसह सिद्ध केले होते.

  • २०१७ साली तत्कालीन वनाधिकारी प्रकाश सालेलकर यांनीही पाच पट्टेरी वाघ, चार काळे वाघ असल्याचे छायाचित्रांसह समोर आणले होते.

  • यंदा वनाधिकारी सुहास नाईक यांना स्वयंचलित कॅमेऱ्यात एक वाघीण दोन बछड्यांसोबत साट्रे गावच्या सिद्धेची कोंड या भागात दिसली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bhandari Samaj: भंडारी समाजाच्या नेत्‍यांकडून मोर्चेबांधणी सुरू! एकसंघ करण्‍याच्‍या दृष्‍टीने प्रयत्‍न सुरू; लोकप्रतिनिधींचा होणार गौरव

Morjim: ...तोपर्यंत ‘त्‍या’ स्मशानभूमीचा वापर नको! न्यायालयाचे निर्देश; मोरजी पंचायतीला धक्का

Drugs In Goa: कैद्यांना जर ड्रग्स मिळत असतील, तर बिट्स पिलानी ‘किस झाड की पत्ती’! गोव्याच्या मानगुटीवर बसलेले भूत

आत्महत्या की हत्या? 24 तास बेपत्ता, झुआरी पुलाजवळ आढळलेला मृतदेह, असोल्डातील व्यक्तीच्या मृत्यूने वाढले गूढ

Valpoi: वाळपईत 4 वर्षांत दगावली 154 गुरे! वाढती प्लास्टिक समस्या चिंताजनक; 12 महिन्यांची वासरेही बाधीत

SCROLL FOR NEXT