Goa government fails to curb sand mining  Dainik Gomantak
गोवा

रेतीच्या वारेमाप उत्खननावर आळा घालण्यात गोवा सरकार 'अपयशी'..

डिचोली तालुक्यातील रूमडवाडा-पाळी येथे मांडवी नदीच्‍या पात्रातून मोठ्या प्रमाणात रेतीचा उपसा होत असल्याने त्याचे गंभीर दुष्परिणाम परिसरातील पर्यावरणावर जाणवू लागले आहेत.

दैनिक गोमन्तक

पणजी : डिचोली (Bicholim Goa) तालुक्यातील रूमडवाडा-पाळी येथे मांडवी नदीच्‍या पात्रातून मोठ्या प्रमाणात रेतीचा उपसा (Sand extraction) होत असल्याने त्याचे गंभीर दुष्परिणाम परिसरातील पर्यावरणावर जाणवू लागले आहेत.

मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने यापूर्वी राज्‍यातील नदीपात्रात बेकायदा केल्या जाणाऱ्या रेतीच्या वारेमाप उत्खननावर निर्बंध प्रस्थापित करण्यात अपयशी ठरलेल्या सरकारी यंत्रणेवर ताशेरे ओढलेले असतानाच, रूमडवाडा येथे रविवारी पहाटेपासून रेतीचा उपसा आणि वाहतूक सुरू आहे. गोवा सरकारतर्फे अधिसूचित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय समितीमार्फत यापूर्वी कोलवाळ नदी पात्रात राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेतर्फे सादर करण्यात आलेल्या अहवालाच्या अनुषंगाने चार ठिकाणी रेतीचा उपसा करण्यास अनुमती दिलेली आहे. परंतु अन्य ठिकाणच्या नदीत रेतीउत्खननाबाबत निर्णय घेतलेला नसताना बेकायदा मार्गाने हा व्यवसाय चालू असलेला पाहायला मिळत आहे.

विशेष म्‍हणजे रूमडवाडा-पाळी येथे यापूर्वी बेकायदा केल्या जाणाऱ्या रेती उत्खननाबाबत डिचोली मामलेदार, पोलिस तसेच संबंधित अधिकाऱ्यांकडे रितसर तक्रारी केलेल्या असताना रेती उत्खनन आणि वाहतूक या परिसरात सध्या मोठ्या प्रमाणात सुरू आहे. यामुळे नदीच्या दुतर्फा किनारपट्टीची माती वाहून जाऊन पर्यावरणीय परिसंस्थेची हानी झालेली आहे. येथे एकेकाळी खुब्यांची पैदास व्हायची. पण आता तेथे लोक बुडून मरत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT