Goa Schools Dainik Gomantak
गोवा

गोव्यात आता अडीच वर्षाला पूर्व प्राथमिक शाळांमध्ये प्रवेश मिळणार

नर्सरी वर्गांसाठी परवानगी असलेल्या शिक्षण संस्थांना शिक्षण खात्याच्या सूचना

दैनिक गोमन्तक

पणजी : गोव्यात पूर्व प्राथमिक शाळांमध्ये म्हणजेच केजीच्या प्रवेशासाठी मुलांची वयोमर्यादा अडीच वर्षे करण्यात आली आहे. नर्सरी वर्गांसाठी परवानगी असलेल्या शिक्षण संस्थांना शिक्षण खात्याने तशा सूचना दिल्या आहेत. मागच्याच वर्षी गोवा सरकारने ही मर्यादा 3 वर्षांच्या वर ठेवण्याचे निर्देश दिले होते.

गोव्यात केजी म्हणजेच पूर्व प्राथमिक शाळेच्या प्रवेशासाठीची मर्यादा सरकारने अडीच वर्षांवर आणली आहे. यापूर्वी ही मर्यादा तीन वर्षांची म्हणजेच आताच्या मर्यादेपेक्षा सहा महिन्यांनी जास्त होती. मागच्याच वर्षी जून महिन्यात राज्य सरकारने (Goa Government) हीच मर्यादा तीन वर्षांवर नेली होती. राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 मधील तरतुदींनुसार तसे निर्देश देण्यात आले होते.

31 मे रोजी वयाची तीन वर्षं पूर्ण केलेल्या मुलांनाच पूर्व प्राथमिक शाळांमध्ये (School) प्रवेश देण्यात येईल असे शिक्षण खात्याने आदेश काढले होते. आता याच आदेशाला शिथिलता देत वयोमर्यादा सहा महिन्यांनी कमी करण्यात आली आहे. याचा फायदा हजारो विद्यार्थ्यांना होणार आहे. राज्य सरकारच्या मागील आदेशाला अनेक पालकांनी आव्हान देत मर्यादा कमी करण्याची मागणी केली होती. गोवा (Goa) दीव आणि दमण शालेय शिक्षण कायदा 1984 चा आधार घेत मर्यादा शिथिल केल्याचं शिक्षण खात्याने म्हटलं आहे. तसंच 31 मे रोजी अडीच वर्षांखालील मुलांना प्रवेश न देण्याच्या सूचनाही करण्यात आल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Illegal club Goa: वागातोरमधील प्रसिद्ध 'कॅफे CO2' चे शटर डाऊन! 250 आसनक्षमतेचा क्लब बेकायदेशीर

रडून – रडून 5 किलो वजन घटले, बायको जिवंत मुडद्यासारखी झालीय; गोव्यातल्या 'त्या' नाईट कल्ब डान्सरचा पती भावूक

शूटिंगनंतर कुठे गायब झालाय अक्षय खन्ना? 167 कोटींची मालमत्ता असलेला 'रहमान' राहतोय अलिबागमध्ये; स्वर्गाहून सुंदर फार्महाऊस!

Goa Fire: थिवीत 'अग्निकांड', शॉर्ट सर्किटमुळे घराला आग; 5 लाखांचे नुकसान!

Goa Live Updates: उपसरपंच सुषमा नागवेकर यांच्यासह तीन पंचायती सदस्य चौकशीसाठी पोलीस स्टेशनमध्ये

SCROLL FOR NEXT