पणजी: सरकारी, औद्योगिक तसेच बँक कर्मचाऱ्यांसाठी २०२६ मध्ये देण्यात येणाऱ्या सुट्ट्यांची यादी राज्य सरकारने बुधवारी जारी केली. सर्वसामान्य प्रशासनाने याबाबतची अधिसूचना जारी केली आहे.
अधिसूचनेनुसार सरकारी कर्मचाऱ्यांना यंदा प्रजासत्ताक दिन, होळी, गुढीपाडवा, रमजान ईद, रामनवमी, गुड फ्रायडे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, मे दिवस, बकरी ईद, स्वातंत्र्य दिन, गणेश चतुर्थीचा पहिला आणि दुसरा दिवस, गांधी जयंती, दसरा, दिवाळी, सेंट फ्रान्सिस झेवियर फेस्त, गोवा मुक्ती दिन या दिवशी सुट्टी मिळणार आहे.
याशिवाय महाशिवरात्री आणि ईद ए मिलाद अशा दोन विशेष सुट्ट्या मिळणार आहेत. या कर्मचाऱ्यांना न्यू ईअर डेच्या दोन, मकरसंक्रांत, सेंट जोसेफ वाझ फेस्त, गुरु रविदास वाढदिवस, शिवजयंती, महावीर जयंती, माँडी थर्सडे, वैशाखी, बुद्धपौर्णिमा, मोहरम, ओणम, रक्षाबंधन, कृष्ण जन्माष्टमी, गोवर्धन पूजा, भाऊबीज, गुरु नानक जयंती, गुरु तेजबहाद्दूर शहीद दिन, मेरी इमॅक्युलेट फेस्त व ख्रिसमस या दिवशी ऐच्छिक सुट्टी राहणार आहे.
औद्योगिक कामगारांसाठी प्रजासत्ताक दिन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, मे दिवस, स्वातंत्र्य दिन, गणेश चतुर्थीचा पहिला दिवस, गांधी जयंती, गोवा मुक्ती दिन आणि ख्रिसमस दिवशी सुट्टी असेल. तर, बँक कर्मचाऱ्यांना प्रजासत्ताक दिन, होळी, गुढीपाडवा, रमजान ईद, १ एप्रिल, गुड फ्रायडे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, मे दिवस, बकरी ईद, स्वातंत्र्य दिन, गणेश चतुर्थीचा पहिला आणि दुसरा दिवस, गांधी जयंती, दसरा, दिवाळी, सेंट फ्रान्सिस झेवियर फेस्त, गोवा मुक्ती दिन आणि ख्रिसमस दिवशी सुट्टी राहील, असे अधिसूचनेत नमूद केले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.