Goa municipal administrator appointment Dainik Gomantak
गोवा

Goa Municipal Administrator: मडगाव, मुरगाव आणि म्हापसा नगरपालिकेवर प्रशासकांची नियुक्ती; राज्य सरकारचा मोठा निर्णय, आदेश लागू

Goa Municipality Administrators Appointed: राज्य सरकारने मडगाव, मुरगाव आणि म्हापसा या राज्यातील महत्त्वाच्या तीन नगरपालिकांवर प्रशासकांची नियुक्ती केली असून या नियुक्त्या उद्यापासून (ता.२७) लागू होणार आहेत.

दैनिक गोमन्तक डिजिटल

पणजी: राज्य सरकारने मडगाव, मुरगाव आणि म्हापसा या राज्यातील महत्त्वाच्या तीन नगरपालिकांवर प्रशासकांची नियुक्ती केली असून या नियुक्त्या उद्यापासून (ता.२७) लागू होणार आहेत. नगर प्रशासन संचालनालयाकडून यासंदर्भातील आदेश जारी करण्यात आले असून पुढील आदेश येईपर्यंत हे प्रशासक संबंधित नगरपालिकांचा कारभार सांभाळणार आहेत.

जारी आदेशानुसार दक्षिण गोवा व कुशावतीचे अतिरीक्त जिल्हाधिकारी १ श्रीनेत कोठावळे यांची मडगाव नगरपालिका प्रशासकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. दक्षिण गोव्यातील सर्वांत मोठ्या आणि आर्थिकदृष्ट्या महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या मडगाव नगरपालिकेचा कारभार आता त्यांच्या नेतृत्वाखाली चालणार आहे. शहरातील स्वच्छता, बाजार व्यवस्थापन, पायाभूत सुविधा, वाहतूक कोंडी तसेच विविध विकासकामांशी संबंधित निर्णय प्रक्रियेला यामुळे गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

दरम्यान, नागरी पुरवठा संचालक जयंत तारी यांची मुरगाव नगरपालिका प्रशासकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. वास्को शहर आणि बंदर परिसराशी संबंधित विविध नागरी प्रश्न, पाणीपुरवठा, रस्ते दुरुस्ती, घनकचरा व्यवस्थापन आणि पर्यटनाशी निगडित सुविधा या विषयांवर प्रशासकीय पातळीवर तत्काळ निर्णय घेण्याची जबाबदारी त्यांच्यावर असणार आहे.

म्हापसा नगरपालिका परिषदेच्या प्रशासकपदी अतिरीक्त पंचायत संचालक (उत्तर) फियोना कार्दोज यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उत्तर गोव्यातील व्यापारी केंद्र म्हणून ओळख असलेल्या म्हापसा शहरात बाजारपेठ व्यवस्थापन, वाहतूक नियंत्रण, स्वच्छता आणि नागरी सुविधा यांसारख्या प्रश्नांना प्राधान्य देण्यात येण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao Vegetable Vendors: महिला भाजी विक्रेत्यांना मडगावात जागा उपलब्ध करणार; दिगंबर कामत

Navpancham Yog 2026: आर्थिक भरभराट अन् नोकरीत प्रमोशन! 4 राशींसाठी 'नवपंचम योग' ठरणार जॅकपॉट; करिअरला मिळणार रॉकेटसारखी गती

Goa Rooftop Solar Scheme: छतावर सोलर लावा अन् मिळवा 2.20 लाखांपर्यंत अनुदान; गोव्यात नवी योजना लागू

Goa Politics: जाहीर सभेसाठी आम्हाला सरकारने जागा नाकारली, खासगी जागेवर सभेचे आयोजन करावं लागलं; चोडणकरांचा आरोप

Military Dog Tyson: लष्कराचा श्वान ‘टायसन’ला शौर्यसन्मान, गोळी झाडल्यानंतरही दहशतवाद्यांवर केला होता हल्ला

SCROLL FOR NEXT