Goa Illegal Liquor seized in Telangana  Dainik Gomantak
गोवा

Goa Airport : आता राज्यातील विमानतळावर 24 तास मद्य विक्री; दुरुस्ती अधिसूचना जारी

आता राज्यातील मोपा व दाबोळी विमानतळावर 24 तास किरकोळ मद्य विक्री सेवा उपलब्ध होणार आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

24hr Liquor Sale On Goa Airports Outlets : इतर राज्यांच्या तूलनेत मद्य गोव्यात स्वस्त मिळते. स्वस्त दरात मिळणाऱ्या मद्यामुळं अनेक पर्यटक राज्यात येत असतात. मद्याच्या विक्रीतून सरकारला महसूल मिळतो. राज्यात विमानतळे वगळता रात्री 10 पर्यंत मद्याची दूकाने तसेच बार सुरु ठेवण्याची परवानगी आहे.

दरम्यान, आता राज्यातील मोपा व दाबोळी विमानतळावर 24 तास किरकोळ मद्य विक्री सेवा उपलब्ध होणार आहे. मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळाचे कामकाज लक्षात घेऊन अबकारी नियमांमध्ये सुधारणा करण्यात आली आहे.

विमानतळावर मद्य तसेच बार 24 तास सुरु ठेवण्याच्या कायद्यात दुरुस्ती केल्याची अधिसूचना काढण्यात आली आहे. ऑगस्ट महिन्यात झालेल्या विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात हा विषय चर्चेला आला होता.

त्यावेळी अबकारी कायद्यात दुरुस्ती करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली होती. त्यानुसार दुरुस्ती करण्यात आली आहे.

विमानतळावर 24 तास मद्य विक्री सेवा उपलब्ध देण्यासाठी संबंधित दुकानदारास परवाना व इतर शुल्क भरावे लागणार आहे. विमानतळावर परवाना देण्यात आलेल्या जागेतच हा व्यवसाय करता येणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pusapati Ashok Gajapathi Raju: पुसापती अशोक गजपती राजूंनी गोव्याचे राज्यपाल म्हणून स्वीकारली सूत्रे; आंध्रवासीयांच्या आनंदाला भरते

खेळणं म्हणून एक वर्षाच्या मुलाने किंग कोब्राचा घेतला चावा; सापाचा मृत्यू, बाळ सुरक्षित

चप्पलने बडवेन! दिल्लीत मुख्यमंत्री सिद्धरामया आणि शिवकुमार यांचे OSD भिडले; सचिवांनी दिले चौकशीचे आदेश

Shocking Video: चावी फिरवत आली अन् क्षणातच चौथ्या मजल्यावरून मारली उडी; दहावीच्या मुलीनं शाळेतच संपवलं आयुष्य, पाहा थरारक व्हिडिओ

Jasprit Bumrah Retirement: रोहित-विराटनंतर बुमराहही कसोटी क्रिकेटला करणार रामराम? माजी भारतीय खेळाडूच्या विधानाने खळबळ

SCROLL FOR NEXT