Body of Youth Found At Shigao River: शिरगाव येथून बेपत्ता असलेल्या लक्ष्मण शेळके या पुरातत्व खात्याच्या सुरक्षा रक्षकाचा मृतदेह अखेर गुरुवारी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास नदीत सापडला.
कुळे पोलिस, अग्नीशामक दल, जीवरक्षक तसेच ग्रामस्थांनी शोध कार्यात सहभाग घेतला होता. मृतदेह शवचिकित्सा करण्यासाठी बांबोळी येथे पाठविण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शिरगाव सातेरी मंदिराजवळ असलेल्या पुरातत्व खात्याअंतर्गत सुरक्षा रक्षक म्हणून कामाला असलेला काले येथील लक्ष्मण शेळके (27) हा आपले चप्पल, कपडे, मोबाईल नदीच्या काठावर ठेवून बेपत्ता झाला होता.
"दुपारी जेवण करायला पाहिजे म्हणून हात पाय धुण्यासाठी नदीवर गेला असण्याची शक्यता आहे. तेव्हापासून तो बेपत्ता आहे" असे कुटुंबीयांचे म्हणणे आहे.
कुळे पोलिसांना याची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल होत कुडचडे येथील अग्नीशामक दलाला पाचारण करण्यात आले. पोलिस, ग्रामस्थ, कुटुंबीयांनी बुधवारी शोधाशोध केली मात्र रात्र झाल्याने शोधकार्य थांबविण्यात आले.
गुरुवारी सकाळी शोधकार्य सुरु केले असता सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास नदीत मृतदेह सापडला. मृतदेह शवचिकित्सा करण्यासाठी बांबोळी येथे पाठविण्यात आला आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.