Telangana Academy of Skill and Knowledge Dainik Gomantak
गोवा

तंत्रज्ञान कौशल्‍यवाढीसाठी गोव्याने तेलंगणातील 'टास्‍कशी' केला करार

Goa latest News: राज्‍य सरकारचा तेलंगणा येथील अकादमी फॉर स्किल अँड नॉलेज टास्‍क सोबत केला करार

दैनिक गोमन्तक

Goa latest News: राज्‍यात पदवीधर युवकांची कमतरता नाही. पण नियमित शिक्षणाशिवाय त्‍यांच्‍यात इतर कौशल्‍ये कमी असतात. यासाठी राज्‍य सरकारचा तेलंगणा येथील अकादमी फॉर स्किल अँड नॉलेज (टास्‍क) सोबत करार करण्याचा मानस असल्‍याचे माहिती व तंत्रज्ञान मंत्री रोहन खवंटे यांनी सांगितले.

या अकादमीने तेलंगणामध्ये राबविलेल्‍या या उपक्रमाला चांगले यश मिळाले आहे. यासाठी माहिती आणि तंत्रज्ञान खाते टास्‍कसोबत करार करू इच्छित असल्‍याचे मंत्री खवंटे म्‍हणाले. टास्‍कच्‍यावतीने कुशल पदवीधर आणि उद्योगांना आवश्‍यक असलेले कौशल्‍य यातील दरी कमी करण्यासाठी धोरण तयार करणार आहे.

यासाठी टास्‍कच्‍या अधिकाऱ्यांनी स्थानिक उद्योग, शैक्षणिक संस्था आणि उद्योजकांशी चर्चा सुरू केली आहे. हा करार झाल्‍यास स्‍थानिक तरुणांना आयटी किंवा आयटी संबंधित सेवांमधील आवश्‍यक कौशल्‍यांची माहिती दिली जाईल. जे तरुण अर्धकुशल आहेत, त्‍यांना र्कौशल्याचे पूर्ण ज्ञान दिले जाईल.

* टास्कच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक-

मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि मंत्री खवंटे यांनी यावर चर्चा करण्यासाठी टास्‍कच्‍या अधिकाऱ्यांसोबत नुकतीच बैठक घेतली. कौशल्‍यवाढीसाठी करावयाच्‍या उपाययोजनांवरही यावेळी चर्चा करण्यात आली. टास्‍कसोबत झालेल्‍या बैठकीवेळी टास्‍कचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकांत सिन्हा यांनी त्‍यांच्‍या कामाचे सादरीकरण केले आहे. टास्‍क शैक्षणिक संस्थांना उद्योगासाठी आवश्‍यक असलेला अभ्यासक्रम तयार करण्यास मदत करेल. याबात आमची मुख्यमंत्र्यांशी बैठक झाली आहे. त्यांनी टास्‍कसोबत सामंजस्य करार मान्‍यता दिली आहे, असे मंत्री खवंटे यांनी सांगितले.

रोहन खंवटे, माहिती तंत्रज्ञानमंत्री-

माहिती आणि तंत्रज्ञान या क्षेत्रांशिवाय राज्य सरकार फार्मास्युटिकल्स, इलेक्ट्रॉनिक उत्पादन, विमान वाहतूक आणि इतर संबंधित उद्योगांच्‍या आवश्‍यक असणाऱ्या कौशल्याचा शोध घेत आहे. टास्‍क राज्‍यातील महाविद्यालयाच्या पहिल्या वर्षापासूनच स्थानिक शैक्षणिक संस्थांसोबत काम करेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

Goa Ranji Trophy 2026: बडोद्याकडून पराभवाचा झटका; मोहित रेडकर, दीपराज गावकर यांना गोव्याच्या रणजी संघातून डच्चू!

SCROLL FOR NEXT