Goa Ram Niwas Dainik Gomantak
गोवा

Goa Ram Niwas: अयोध्येत 'राम निवास' उभारण्यासाठी गोवा सरकारला येणार 23.57 कोटींचा खर्च, योगी सरकारने दिला भूखंड

Goa government Ayodhya: योध्येत श्री रामलल्ला मंदिरापासून विमानतळाच्या दिशेने ५ किलोमीटर अंतरावर गोवा राम निवास उभारण्यात येणार आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी : अयोध्येत श्री रामलल्ला मंदिरापासून विमानतळाच्या दिशेने ५ किलोमीटर अंतरावर गोवा राम निवास उभारण्यात येणार आहे. त्यासाठी अयोध्या येथे गोवा सरकारने भूखंड संपादित केला आहे. परशुराम भूमीतून श्री राम भूमीत जाणाऱ्या भाविकांचा निवास व इतर व्यवस्थेचा प्रश्न यामुळे सुटणार आहे.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सहकारी मंत्री, भाजपचे पदाधिकारी यांच्यासह गेल्या वर्षी फेब्रुवारीत अयोध्येत श्री रामलल्लाचे दर्शन घेण्यासाठी गेले होते. त्यावेळी भूखंड उपलब्ध झाल्यास गोवा भवनच्या धर्तीवर भक्तनिवास उभारण्याची घोषणा त्यांनी केली होती.

त्यानंतर उत्तर प्रदेश सरकारने उत्तर प्रदेश आवास आणि विकास परिषदेकडे हा विषय सोपविला होता. त्या परिषदेने काही भूखंड राज्य सरकारला सूचविले होते

मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले, की उत्तर प्रदेशातील अयोध्या येथे गोवा सरकारने एक भूखंड संपादित केला आहे. या ठिकाणी ‘गोवा राम निवास’ उभारण्यात येणार आहे, जे विशेषतः गोव्यातील श्रीराम भक्तांसाठी एक समर्पित निवासस्थान असेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाखाली अयोध्येत भव्य श्रीराम मंदिराचे स्वप्न साकार झाले आहे.

३,८०१.८६ चौ.मीृ. प्रशस्त जागा

भूखंडांच्या पाहणीसाठी राज्य सरकारने १० फेब्रुवारीदरम्यान अधिकाऱ्यांचे पथक अयोध्येला पाठविले होते. त्यात विविध खात्यांचे अधिकारी होते. त्यांनी हा ३ हजार ८०१.८६ चौरस मीटरचा भूखंड पसंत केला. या पथकात मुख्यमंत्री कार्यालयातील अधिकाऱ्यांचाही समावेश होता. त्यांच्याकडून मुख्यमंत्र्यांसमोर सादरीकरण करण्यात आले. त्‍यानंतर या भूखंडाला मान्यता देण्यात आली.

प्रशासन खात्याची तत्काळ मंजुरी

सर्वसाधारण प्रशासन खात्याकडून आता या भूखंडासाठी २३ कोटी ५७ लाख ३२ हजार ८०९ रुपये अदा करण्यास मंजुरी दिली आहे. याशिवाय मुद्रांक व नोंदणीसाठीचे शुल्क सरकार नंतर जमा करणार आहे. गुरुवारी (ता. २०) वित्त खात्याने या खर्चाला मंजुरी दिल्यानंतर ती रक्कम उत्तर प्रदेश आवास आणि विकास परिषदेकडे जमा करण्याचा आदेश २४ तासांत सर्वसाधारण प्रशासन खात्याने जारी केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 'ऑर्डर उशिरा का आणली?' म्हणत डिलिव्हरी बॉयला फ्लॅटमध्ये खेचून मारहाण, तीन मिनिटांचा CCTV व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! पगार किती वाढणार? फिटमेंट फॅक्टर किती असेल? 5 महत्त्वाचे अपडेट्स आले समोर

Rishabh Pant Record: गिलख्रिस्टचा वर्ल्ड रेकॉर्ड उद्ध्वस्त! ऋषभ पंत बनला 'सिक्सर किंग', परदेशात 'अशी' कामगिरी करणारा ठरला पहिलाच खेळाडू

Investment Fraud: भरघोस परताव्याचं स्वप्न दाखवलं अन् 85.5 लाखांवर डल्ला! शिवोलीतील महिलेची फसवणूक, मुंबईतील दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल

AUS vs BAN: क्रिकेटविश्वात मोठा उलटफेर! बांगलादेशनं बलाढ्य ऑस्ट्रेलियाला 9 विकेट्सनं लोळवलं, 30 मिनिटांत कांगारूंचा खेळ खल्लास Watch Video

SCROLL FOR NEXT